हे तर इगोइस्ट सरकार! का चालवलाय पोरखेळ? देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:10 PM2021-02-11T13:10:56+5:302021-02-11T13:44:02+5:30
आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही
पुणे : राज्यातील ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संताप व्यक्त केला आहे.
पुणे महानगरपालिकेला देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना यापूर्वी कधी घडलेली नाही. राज्यपाल हे व्यक्ती नाही एक पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. परंतु, विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नाही असा आरोप केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही. ही खासगी मालमत्ता नाही. ही राज्याची मालमत्ता आहे, कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नाही. पण ज्याप्रकारे सरकार वागताहेत ते योग्य नाही. आजपर्यंत मी एवढे इगोस्टीक सरकार कधी पहिले नाही. पण रस्त्यावर चालतात अशा[प्रकारची भांडणे राज्य सरकारकडून उकरली जात आहे.सरकारकडून हा सर्व अतिशय पोरखेळ आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही.
चर्चा तर होणारच ! देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटील पुण्यात; पण वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित
भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहे. याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातच आहे. मात्र फडणवीस आणि पाटील हे पुण्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित आहे. यामुळे फडणवीसांच्या पुणे महानगरपालिका भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील हे अनुपस्थित होते. याच मुद्द्यांवरून राजकीय तर्क वितर्काना उधाण आले होते. पण भाजपकडून याबाबत खुलासा देण्यात आल्यामुळे या विषयावर पडदा पडला.