देवनार डंपिंग ग्राऊंड पुन्हा आगीच्या विळख्यात
By admin | Published: June 9, 2016 12:28 AM2016-06-09T00:28:34+5:302016-06-09T03:19:40+5:30
मुंबईतलं सगळ्यात मोठं डंपिंग ग्राऊंड असलेल्या देवनार डंपिंग ग्राऊंडला पुन्हा आग लागली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९- मुंबईतलं सगळ्यात मोठं डंपिंग ग्राऊंड असलेल्या देवनार डंपिंग ग्राऊंडला बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या पुन्हा आग लागली होती. आग हळूहळू पसरत जाऊन आगीनं उग्ररूप धारण केलं असतानाच घटनास्थळी उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विजवण्याचे तत्काळ प्रयत्न सुरू केले. त्यानंतर मानखुर्द अग्निशमन दलाच्या एकूण ४ गाड्या आणि ४ वॉटर टँकरनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कूलिंग आॅपरेशन सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत होता. मागच्या वेळी लागलेल्या आगीनं प्रदूषणाची उच्चांकी पातळी गाठली होती. १३२ हेक्टर जागेवर देवनार डंपिंग ग्राऊंड पसरलं असून, जवळपास ही आग पसरत चालली आहे. 27 जानेवारीला लागलेली आगही जवळपास 8 दिवस धुसमत राहिली होती. त्यावेळी आगीच्या धुरात मिथेन आणि विषारी द्रव्ये मिसळल्यानं धुराचा थर बनला होता.
(देवनार डंपिंग ग्राऊंडवर तोडगा काढण्यासाठी सचिनचं महापालिका आयुक्तांना पत्र)
हा थर देवनारचा आजूबाजूचा परिसर म्हणजेच गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूर, टिळकनगर, घाटकोपर, कुर्ला,वडाळा, शीव परिसरात पसरला होता. काही प्रमाणात पश्चिम उपनगरंही या प्रदूषणानं प्रभावित झाली होती. आजूबाजूच्या परिसरातली लोकांना डोळे चुरचुरणे, खोकला, घशामध्ये खवखवण्यासारखे विकार बळावले होते. त्यामुळे ही आग वेळीच विझवणं गरजेचं आहे.