पशुसंवर्धन विभागानेच जाळली जनावरांची औषधी!

By admin | Published: March 3, 2017 12:42 AM2017-03-03T00:42:34+5:302017-03-03T00:42:34+5:30

मालेगाव येथील प्रकार : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा चौकशीचा आदेश

Department of Animal Husbandry is the only drug! | पशुसंवर्धन विभागानेच जाळली जनावरांची औषधी!

पशुसंवर्धन विभागानेच जाळली जनावरांची औषधी!

Next

वाशिम, दि.२ - मालेगाव येथील पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या दवाखान्यालगतच, जनावरांसाठी उपयुक्त असणारी शासकीय औषधी काही अधिकाऱ्यांनी जाळून नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी उघडकीस आणला. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे यांच्याकडे तक्रार येताच, चौकशीचा आदेश देण्यात आला.
ग्रामीण भागातील जनावरांवर तातडीने व अत्यल्प दरात तसेच मोफत उपचार मिळावे म्हणून पशुसंवर्धन उपचार केंद्र व दवाखान्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या दवाखान्यांत लाखमोलाचा औषधी साठाही पुरविला जातो. मालेगाव येथील पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या दवाखान्यामागील मोकळ्या जागेत गुरुवारी दुपारच्या सुमारास जनावरांची औषधी जाळून नष्ट करण्यात आली. ही बाब शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान बोरकर यांच्या निदर्शनात येताच घटनास्थळी शिवसैनिक जमा झाले. यावेळी न जळालेली काही औषधी पुरावा म्हणून घेण्यात आली. यापैकी काही औषधीवर ‘एक्स्पायरी डेट’ ही फेब्रुवारी २०१८ असल्याचे नमूद आहे. आणखी एक वर्षभर मुदत असतानाही औषधी जाळून का टाकण्यात आली, यामागे मोठे घबाड तर नाही ना? या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी भगवान बोरकर, गजानन बोरचाटे, गजानन केंद्रे आदींनी केली आहे.

चौकशीचा आदेश दिला - डॉ. कल्यापुरे
मालेगाव येथे घडलेल्या औषध जाळण्याच्या गंभीर प्रकारासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल. दोषींविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे यांनी सांगितले.

Web Title: Department of Animal Husbandry is the only drug!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.