गटविकास अधिकाऱ्यास कोंडले
By Admin | Published: July 8, 2014 10:59 PM2014-07-08T22:59:20+5:302014-07-08T22:59:20+5:30
मंठा: रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामांचे बिले थकल्याने सावरगावच्या लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समितीच्या कार्यालयास कुलूप ठोकून गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडल्याचा प्रकार घडला.
पुणो : आगामी विधानसभा निवडणुका आणि महायुतीला राज्यात मिळालेले यश पाहता यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि पुण्यासाठी चांगली तरतूद असेल, अशी जी अपेक्षा होती ती पुन्हा एकदा फोल ठरल्याने पुणोकरांची निराशा झाली आह़े
या रेल्वे अर्थसंकल्पात पुण्यासाठी केवळ 2 नव्या गाडय़ा मिळाल्या असून, पुण्यातून जाणा:या 2 गाडय़ा मिळणार आहेत़ याशिवाय पुणो स्टेशनवर वायफाय सुविधा आणि कजर्त ते लोणावळादरम्यान चौथ्या रेल्वेलाईनची घोषणा एवढेच पुणोकरांच्या वाटय़ाला आले आह़े
कजर्त ते लोणावळा या घाट सेक्शनमध्ये चौथ्या रेल्वेलाईनची घोषणा करण्यात आली असली, तरी लोणावळा ते पुणोदरम्यान तिस:या लाईनचा सव्र्हे झाला आह़े या लाईनच्या कामाची घोषणा अपेक्षित होती़ लोणावळा ते पुणोदरम्यान तिसरी लाईन झाली, तरच पुणो ते मुंबईदरम्यान आणखी प्रवासी गाडय़ा वाढू शकतील़ पण, ही घोषणा न झाल्याने पुणोकरांची निराशा झाली आह़े या अर्थसंकल्पात स्वच्छता आणि सुरक्षेवर भर देण्यात आला आह़े पुणो रेल्वे स्टेशनवरील साफसफाईसाठी सध्या अंशत: आऊटसोर्सिग केले जात आह़े त्यात वाढ होण्याची शक्यता आह़े रेल्वे सुरक्षा दलात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 7 हजार काँस्टेबल आणि 4 हजार महिलांची भरती केली जाणार आह़े पुणो विभागातील रेल्वेगाडय़ांवरील वाढते गुन्हे लक्षात घेऊन त्यातील काही कर्मचारी पुण्याच्या वाटय़ाला येण्याची शक्यता आह़े
इंटरनेटवरून तिकीट बुकिंगमध्ये देशात पुणो हे आघाडीवर आह़े त्यात आणखी वाढ होणार आह़े त्याचा फायदा पुणोकर इंटरनेट युझर घेऊ शकतील़ तसेच इंटरनेटवरुन प्लॅटफॉर्म तिकीट आणि अनारक्षित तिकीट उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े मोबाईलवर आधारित अनेक सुविधा देण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आह़े त्याचाही लाभ पुणोकरांना होऊ शकेल़ (प्रतिनिधी)
नागपूर-पुणो (साप्ताहिक),
निजामुद्दीन-पुणो (साप्ताहिक)
4या दोन वातानुकूलित एक्स्प्रेस गाडय़ा, तसेच अहमदाबाद-चेन्नई (आठवडय़ातून दोन दिवस) वसई रोड आणि बीदर - मुंबई एक्स्प्रेस (साप्ताहिक) या पुण्यातून जाणा:या आणखी दोन गाडय़ांची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आह़े
4देशातील ए दर्जाच्या स्टेशनवर इंटरनेट वायफाय सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आह़े पुणो रेल्वे स्टेशन हे ए दर्जाच्या रेल्वे स्टेशनमध्ये मोडत असल्याने येथेही वायफाय सुविधा मिळणार आह़े
महाराष्ट्रातील माळशेज रेल्वे, नाशिक-पुणो रेल्वेबाबत ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. परंतु महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली आहे. दौंड-पुणो विद्युतीकरणाबाबत कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी फक्त लोकप्रिय घोषणा करुन खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प सामान्य प्रवाशांसाठी निराशाजनक आहे.
-सुप्रिया सुळे,
खासदार