संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By admin | Published: June 20, 2016 03:11 PM2016-06-20T15:11:41+5:302016-06-20T15:11:41+5:30
संत निवृत्तिनाथ महाराज दिंडीचे सोमवारी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 20- संत निवृत्तिनाथ महाराज दिंडीचे सोमवारी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीचा हा २५ दिवसांचा पायी प्रवास आहे. चांदीच्या रथास माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची बैलजोडी गजानन महाराज संस्थानतर्फे जोडण्यात आली. त्यानंतर नाशिकचे जायभावे यांची बैलजोडी संपूर्ण प्रवासात राहणार आहेत.
मंदिरापासून कुशावर्तावर पालखीची मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांच्या हस्ते पूजा करून पालखीला निरोप देण्यात आला. जाताना २६ दिवस तर परतीचा १६ दिवसांचा प्रवास आहे. दिंडी समवेत जाताना सुमारे ५० हजार भाविक दिंडीस येऊन मिळतात. यावर्षी अधिक संस्था सहभागी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पाणीटंचाई, दुष्काळाचे दिवस असतानाही पालखी समवेत जाणाऱ्या भाविकांचा उदंड उत्साह दिसून येत आहे. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर्स आदि शासकीय सुविधांचा वानवा राहणार नाही. दिंडी सोहळ्याचे नाशिक, पळसे, लोणारवाडी आदि ठिकाणी नाशिक जिल्ह्यात दिंडीचा मुक्काम होईल.