अन्नधान्यापासून लाभार्थी वंचित
By admin | Published: February 9, 2017 05:14 AM2017-02-09T05:14:24+5:302017-02-09T05:14:24+5:30
द्वारपोच अन्नधान्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याऱ्या वाहनांची देयके थकल्याने वाहनधारकांनी सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे
विवेक चांदूरकर, बुलडाणा
द्वारपोच अन्नधान्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याऱ्या वाहनांची देयके थकल्याने वाहनधारकांनी सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरापर्यंत स्वस्त धान्य पोहोचविण्याासाठी चार महिन्यांपूर्वी शासनाने ‘द्वारपोच अन्नधान्य
योजना’ सुरू केली. धान्य पोहोचविण्याकरिता जिल्हास्तरावर संस्थेला वाहनांचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदार चार महिन्यांपासून धान्य ग्राहकांच्या घरापर्यंत
पोहोचवित आहे. गोदामांपासून लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचवण्यासाठी दोन टप्प्यांत वाहने लावण्यात आली आहेत.
पहिल्या टप्प्यात ७०, तर दुसऱ्या टप्प्यात १५० वाहने आहेत. जिल्ह्यात शासनाची १६ गोदामे आहेत. या त्यातून १५३६ स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना १ लाख २६ हजार क्विंटल धान्य वाटप करण्यात येते.
यामध्ये अंत्योदय योजना, शेतकरी लाभार्थी योजना, प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे. मात्र चार महिन्यांपासून अन्नधान्य पोहोचविणाऱ्या वाहनांच्या भाड्याची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत.