६७ झोपडीधारकांना सदनिकांचे वितरणपत्र

By Admin | Published: October 19, 2016 02:07 AM2016-10-19T02:07:59+5:302016-10-19T02:07:59+5:30

बहुप्रतीक्षेतील धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर-५च्या पुनर्विकासात आता पुढचे पाऊल पडले आहे.

Deployment of plots for 67 hutment dwellers | ६७ झोपडीधारकांना सदनिकांचे वितरणपत्र

६७ झोपडीधारकांना सदनिकांचे वितरणपत्र

googlenewsNext


मुंबई: बहुप्रतीक्षेतील धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर-५च्या पुनर्विकासात आता पुढचे पाऊल पडले आहे. म्हाडाने या प्रकल्पांतर्गत उभारलेल्या १८ मजली पथदर्शी (पायलेट) इमारतीत क्लस्टर जे मधील ६७ निवासी पात्र झोपडीधारकांना मंगळवारी चिठ्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र प्रदान केले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका
द्यावी, याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला. त्यामध्ये ६७ पात्र झोपडीधारकांना कागदपत्रांची
पूर्तता केल्यानंतर सदनिकेचा ताबा दिला जाणार आहे. या इमारतीत
३०० चौरस फुटांच्या (कार्पेट)
३५८ सदनिका आहेत. यापूर्वी मे महिन्यात क्लस्टर जे मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शताब्दी नगर या वसाहतीतील झोपडीधारकांची पात्र-अपात्रबाबतची प्रक्रिया राबविल्यानंतर २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.
इमारतीच्या प्रांगणात आज झालेल्या या कार्यक्रमाला
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी
चंद्रकांत डांगे, उपमुख्य अधिकारी के. व्ही. वळवी, उपमुख्य अधिकारी
टी. पी. राठोड, उपमुख्य
अधिकारी विराज मढवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Deployment of plots for 67 hutment dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.