६४१ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Published: March 3, 2017 12:45 AM2017-03-03T00:45:23+5:302017-03-03T00:45:23+5:30

महापालिका निवडणुकीत २६ लाख ३४ हजार ८०० मतदारांपैकी एकूण १४ लाख ६३ हजार ४९३ जणांनी मतदान केले.

The deposit of 641 candidates was seized | ६४१ उमेदवारांची अनामत जप्त

६४१ उमेदवारांची अनामत जप्त

Next


पुणे : महापालिका निवडणुकीत २६ लाख ३४ हजार ८०० मतदारांपैकी एकूण १४ लाख ६३ हजार ४९३ जणांनी मतदान केले. प्रत्येकी चार (दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी ३) याप्रमाणे एकूण ५८ लाख ४ हजार ६३५ मतदान झाले. १ हजार ९० उमेदवारांपैकी ६४१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. नोटा या पर्यायावर १ लाख ७१ हजार ५८१ मतदान झाले. एकूण मतदान ५५.५ टक्के, तर नोटाची मते ३ टक्के आहेत.
महापालिका निवडणूक २०१७ ची अंतिम आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ४१ प्रभागांमधून नगरसेवकपदासाठी उभे राहिलेल्या १ हजार ९० उमेदवारांपैकी ६४१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. गटातील वैध मतदानाच्या तुलनेत एक अष्टमांशपेक्षा कमी मते मिळाली ( ८०० वैध मते असतील तर किमान १००पेक्षा जास्त) तर अनामत रक्कम जप्त होते. पालिकेत ९८ सदस्यांचे स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपाच्या ५ उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली.
भाजपाला या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे २१ लाख २८ हजार ४५२ मते मिळाली. राष्ट्रवादीला १२ लाख ७३ हजार ५२४ मते मिळाली. शिवसेनेच्या मतांची संख्या ८ लाख २३ हजार ७४४ आहे. काँग्रेसची मते ५ लाख ९८० आहेत. मनसेला ३ लाख ७३ हजार ६४५ मते मिळाली. काँग्रेसपेक्षा शिवसेनेला जास्त मते मिळाली आहेत. महापालिकेत १० वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
>अपक्षांची एकूण संख्या ३०२ होती. त्यातील २९१ जणांना डिपॉझिट गमवावे लागले. कंसात किती जागा लढवल्या ती संख्या. मनसे (११६) ८६, शिवसेना (१४९) ६९, बहुजन समाज पार्टी (५४) ५०, काँग्रेस (८७) ४०, बहुजन मुक्ती पार्टी (१७) १७, भारिप-बहुजन महासंघ (१६) १६, राष्ट्रवादी (१२९) १६, एमआयएम (२१) १६, राष्ट्रीय समाज पक्ष (१०) ८, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी (८) ६, भाजपा (१५९) ५, अखिल भारतीय सम्राट सेना (५) ५, जनता दल सेक्युलर (५) ५, अखिल भारतीय सेना (२) २, राष्ट्रीय मराठा पार्टी (३) २, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (१) १, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (२) २, संभाजी ब्रिगेड (१) १, भारतीय शेतकरी कामगार पक्ष (१) १, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया अ (२) १
>प्रमुख राजकीय पक्षांना पडलेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : भारतीय जनता पार्टी- ३६. ६, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- २१.९४, शिवसेना- १४. १९, काँग्रेस-८. ६३, मनसे-६.४४,

Web Title: The deposit of 641 candidates was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.