अनामत रक्कम 10 हजार...तिही चिल्लर! निवडणूक अधिकाऱ्याची तारांबळ

By admin | Published: January 17, 2017 09:25 PM2017-01-17T21:25:38+5:302017-01-17T21:25:38+5:30

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात नाऱ्या अर्थात मकरंद अनासपुरे निवडणुकीचा अर्ज भरायला जातो तेव्हा चक्क एक-एक रुपयांचे नाणे घेऊन जातो. याच कृतीची पुनरावृत्ती

The deposit amount is 10 thousand ... even the cheerleader! Election Officer's Columns | अनामत रक्कम 10 हजार...तिही चिल्लर! निवडणूक अधिकाऱ्याची तारांबळ

अनामत रक्कम 10 हजार...तिही चिल्लर! निवडणूक अधिकाऱ्याची तारांबळ

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर,दि.17- गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात नाऱ्या अर्थात मकरंद अनासपुरे निवडणुकीचा अर्ज भरायला जातो तेव्हा चक्क एक-एक रुपयांचे नाणे घेऊन जातो. याच कृतीची पुनरावृत्ती बुधवारी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात घडली. विलास बल्लमवार या उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची चिल्लर आणल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची पार तारांबळ उडाली.

बल्लमवार हे विना अनुदानित शाळा कृती समितीचे उमेदवार आहेत. गेल्या १६ वर्षांपासून विना अनुदानित शाळेचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. महाराष्ट्रात जवळपास ७० हजारांवर विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना आपल्या कामाचे दामसुद्धा मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कुठलाही शिक्षक आमदार आमचे प्रश्न सोडवू शकला नाही, असा या शिक्षकांचा आरोप आहे. त्यामुळे विना अनुदानित शाळा कृती समितीने स्वत:चा उमेदवार नागपूर शिक्षक मतदार संघातून रिंंगणात उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भ विद्यालय, पोटेगाव येथील मुख्याध्यापक विलास बल्लमवार यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. बल्लमवारांनी आपल्या प्रचारात प्रत्येक शिक्षकाकडून ह्यएक रुपया द्या व एक मत द्याह्ण असे आवाहन केले. जवळपास ८८२५ रुपयांची चिल्लर त्यांनी प्रचारादरम्यान गोळा केली. मंगळवारी बल्लमवार विभागीय आयुक्त कार्यालयात गोळा केलेल्या चिल्लर रकमेसह पोहचले. जमा केलेली अख्खी चिल्लर निवडणूक अधिकाऱ्यापुढे अनामत रक्कम म्हणून भरली. ही इतकी चिल्लर बघून निवडणूक निर्णय अधिकारी व उपस्थित कर्मचारी घामघूम झाले.

एका मताबरोबर एक रुपयाही मागितला

नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात मी फिरलो. शिक्षकाला भेटल्यानंतर त्यांना एका मताबरोबर एक रुपयाची मागणी केली. असे करून ८,८२५ रुपये जमा झाले. वरचे पैसे मी टाकले. अशा प्रकारे निवडणुकीचा फॉर्म भरला-विलास बल्लमवार, उमेदवार, नागपूर शिक्षक मतदार संघ 

Web Title: The deposit amount is 10 thousand ... even the cheerleader! Election Officer's Columns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.