५५ हजार शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा,उर्वरित शेतक-यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी: सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 03:03 AM2017-11-16T03:03:50+5:302017-11-16T03:04:02+5:30
आतापर्यंत ५५ हजार शेतक-यांच्या खात्यांवर कर्जमाफीचे ३७० कोटी जमा झाले असून उर्वरित शेतक-यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिली.
मुंबई : आतापर्यंत ५५ हजार शेतक-यांच्या खात्यांवर कर्जमाफीचे ३७० कोटी जमा झाले असून उर्वरित शेतक-यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिली. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.
कर्जमाफीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकावर केलेल्या टिकेला उत्तर देताना देशमुख म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात बँकेकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे कर्जमाफी देण्यात आली. त्यासाठीसुद्धा दहा महिने लागले होते. पण आमचे सरकार गतिमान आहे. नवीन तंत्रज्ञान वापरुन लवकर कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहोत. कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत ५५ हजार शेतक-यांना झाला असून त्यांच्या खात्यांवर ३७० कोटी जमा झाले. येत्या नोव्हेंबरअखेर ८० टक्के शेतक-यांची कर्जमाफी होईल असा दावाही देशमुख यांनी यावेळी केला. कर्जमाफीच्या निकषात बसणारा २००९ पासूनचा कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.