बँकिंग उद्योगाचा आधारवड हरपला
By admin | Published: August 8, 2014 01:50 AM2014-08-08T01:50:51+5:302014-08-08T01:50:51+5:30
मूळ कार्यकत्र्याचा पिंड असलेल्या एकनाथ ठाकूर यांनी केवळ बँकेत नोकरीच केली नाहीतर, त्याचसोबत बँक कर्मचा:यांची संघटना बांधणीवरही भर दिला.
Next
>मुंबई : मूळ कार्यकत्र्याचा पिंड असलेल्या एकनाथ ठाकूर यांनी केवळ बँकेत नोकरीच केली नाहीतर, त्याचसोबत बँक कर्मचा:यांची संघटना बांधणीवरही भर दिला. याचसोबत तरुणांनी बँकिंग क्षेत्रत येऊन देशाच्या अर्थकारणाला हातभार लावण्याच्या दृष्टीने नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची स्थापना करून, लाखो तरुणांना प्रशिक्षणही देण्याचे अनमोल कार्य केले.
एकनाथ ठाकूर यांचे मूळ गाव म्हापण. लहानपणीच त्यांचे आईवडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे त्यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर आणि जिद्दीचा ठरला. भावंडांसहित दारिद्रय़ाशी सामना करीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. कुडाळ येथे किराणा दुकानात काम करीत त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुडाळ हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणो विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रथम श्रेणी परीक्षेमध्ये संपूर्ण भारतात ते पहिले आले होते. तरुण वयातच बँकिंग क्षेत्रत उज्ज्वल कामगिरी करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. अशातच त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचारी संघटना उभारली. त्यानंतर स्टेट बँकेच्या सात उपबँकांसह 8क् हजार अधिका:यांच्या संघटनेचे ते अध्यक्ष झाले. बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर त्यांनी देशभरातील 2 लाख बँक अधिका:यांची संघटना बांधून, पुढे राष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रंतील अधिका:यांच्या संघटना एकत्र करून साडेसहा लाख अधिका:यांच्या भक्कम असोसिएशनची स्थापना केली. 3क् लाख भारतीय अधिका:यांचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांनी बँकेच्या नोकरीवर पाणी सोडले. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी ठाकूर यांची 1977मध्ये युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड केली. तेथून परतल्यानंतर त्यांनी देशात बँकेत अधिकारी होण्यासाठीचे प्रशिक्षण देणारी ‘नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग’ ही संस्था स्थापन केली. ठाकूर यांची प्रशासकीय क्षमता आणि विद्वत्ता जाणून असलेल्या स्टेट बँकेने 2क्क्1मध्ये त्यांना बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे संचालकपदी नियुक्त केले.
2क्क्2 ते 2क्क्8 या कालावधीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर त्यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, राज्यसभेतून ठाकूर ज्या वेळी निवृत्त झाले त्या दिवशी एकूण 57 सदस्य निवृत्त झाले. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्या वेळी निवृत्त होणा:या पी.सी. अलेक्झांडर आणि एकनाथ ठाकूर या दोन सदस्यांचा आवजरून उल्लेख केला होता. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 43 वर्षे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी त्यांनी लढा दिला. बँकिंग क्षेत्रतील आव्हानांशी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे एक आक्रमक पण चिंतनशील बँकिंगतज्ज्ञ म्हणून त्यांचा या क्षेत्रत कायमच दबदबा राहिला.
सारस्वत बँकेचे जाळे विणले
सारस्वत बँकेत ते कार्यरत झाल्यानंतर त्यांनी नागरी सहकारी बँकेचा पूर्णपणो कायाकल्प करण्याचे शिवधनुष्य उचलले. तोवर सारस्वत किंवा देशातील अन्य नागरी सहकाही बँका काही हजार कोटी रुपयांची उलाढाल करत होत्या. परंतु, खाजगी व परदेशी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांशी लोकांशी जोडलेली असलेली नाळ त्यांना नेमकी ठाऊक होती. सहकारी बँका आणि ग्राहक यांचे हे जिव्हाळ्याचे नाते आणि या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी अत्याधुनिक सेवा-सुविधांचा पुरवठा यावर विश्वास देत सारस्वत बँकेला आधुनिकतेचा चेहरा दिला.
देशातीलच नव्हे, तर परदेशातील भारतीयांनाही आकर्षित करण्याच्या दृष्टीने ‘अश्वमेध’ अभियानासारख्या महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आणि पाहता पाहता बँकेची उलाढाल 36 हजार कोटी रुपयांर्पयत नेऊन ठेवली. तसेच, सहकारी बँकांना लागलेली घरघर लक्षात घेत एकूण सात सहकारी बँकांचे सारस्वत बँकेत यशस्वी विलिनीकरण करून त्यांना पुनरूज्जीवन दिले. सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेले ते एकमेव सभासद होते. सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदाची त्यांची ही दुसरी टर्म होती. ते सन 2क्16र्पयत अध्यक्षपदी असणार होते.
कोकणातून मुंबईत आलेल्या ठाकूर यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीने बँकिंग सेवेत नावलौकिक मिळवला. बँकांमध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची स्थापना केली. सामाजिक उपक्र मांमध्येही ते नेहमीच हिरिरीने पुढाकार घेत. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे कर्तृत्व कायम स्मरणात ठेवले जाईल.
- आ. माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
देशातील बँकिंग व्यवसायाला मानवी चेहरा देणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. बँकिंग व्यवसायाशी आलेला हा पहिला संबंध त्यांच्या अखेर्पयत कायम राहिला. महाराष्ट्रातल्या तरुणांना बँकिंग व्यवसायाची दारे खुली करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगने लाखो तरुणांना बँकिंग व्यवसायात नोकरी मिळवून दिली. नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कोकण मराठी साहित्य परिषदेसारख्या विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे होते.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
आदरणीय व्यक्तिमत्त्व गमावले
एकनाथ ठाकूर यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून राज्याच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर आपली छाप पाडली. खासदार म्हणून सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी राज्यसभेत सातत्याने पाठपुरावा केला. नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना बँकिंग क्षेत्नात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच उद्योजक बनण्यासाठीही प्रोत्साहित केले.
- के. शंकरनारायणन्, राज्यपाल
आधारवड हरपला
ठाकूर यांनी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या माध्यमातून अनेक मराठी तरुणांना बँकिंगमध्ये आणले. एक कुशल प्रशासक, बँकिंगचा गाढा अनुभव या जोरावर त्यांनी सारस्वत बँकेला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. सारस्वत बँक त्यांनी स्वत:च्या कुटुंबाप्रमाणो जपली होती. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटीच्या माध्यमातून ठाकूर यांनी कोकण विभागाचा केलेला विकास हा अविस्मरणीय आहे. एक दूरदृष्टी असणारा नेता, मराठी उद्योजक व बँकिंग क्षेत्रचा आधारवड हरपला.
- आ. विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
बँकिंग क्षेत्नात एकनाथ ठाकूर यांनी मोलाची कामगिरी केली. नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या माध्यमातून देशभरातील तीन लाखांहून अधिक उमेदवारांना विविध बँकांच्या भरती परीक्षेचे प्रशिक्षण दिले. ते बँक अधिका:यांच्या संघटनेचे झुंजार नेते होते. इंडियन एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख या नात्याने त्यांनी शिक्षणक्षेत्रतही मोलाची कामगिरी केली. कॅन्सरशी त्यांनी 42 वर्षे लढा दिला होता व त्यासाठी त्यांना ‘कॅन्सर विजेता’ पुरस्कारही मिळाला होता.
- आ. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष