'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:45 PM2019-08-20T12:45:44+5:302019-08-20T13:13:48+5:30

सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

The 'deprived' shock! Will Gopichand Padalkar be the MLA of the historic constituency? | 'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार ?

'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार ?

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीमधील २० हून अधिक नेते भाजपमध्ये दाखल झाले असून काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हाच धक्का आता महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला बसण्याची शक्यता.

भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी असुद्दीन ओवेसी यांच्या सोबतीने दलित-मुस्लीम एकी घडवून वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना केली. त्यात धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना घेत धनगर समाजाला सोबत घेतले. परंतु, पडळकरच पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कामगार पक्ष आधीच आघाडीसोबत आहे. त्यामुळे पडळकर अप्रत्यक्षरित्य आघाडीतच जाणार आहेत.

सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. देशमुख यांनी सांगोल्यातून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी तब्बल ५५ वर्षे सांगोला मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. सांगोला मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला राहिला आहे. गणपतराव देशमुख यांनी १९६२ मध्ये पहिल्यांदा सांगोल्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती. केवळ १९७२ आणि १९९५ मध्ये त्यांना येथून पराभव पत्करावा लागला होता.

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गोपीचंद पडळकर इच्छूक आहेत. वंचितकडून विधानसभेला निवडून येण्याची शाश्वती नसल्यामुळेच पडळकर शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. पडळकर लोकसभा निवडणुकीपासून वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत. त्यांनी सांगली मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: The 'deprived' shock! Will Gopichand Padalkar be the MLA of the historic constituency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.