मूल्यमापनाच्या पेपरफुटीची भीती

By admin | Published: April 5, 2017 03:40 AM2017-04-05T03:40:02+5:302017-04-05T03:40:02+5:30

मूल्यमापन चाचणीसाठी (बेसलाइन टेस्ट) प्रश्नपत्रिका कमी पडत असल्याने त्यांच्या झेरॉक्स काढण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येते आहे.

Depth of Paperfood Depreciation | मूल्यमापनाच्या पेपरफुटीची भीती

मूल्यमापनाच्या पेपरफुटीची भीती

Next

डोंबिवली : आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने मुलांचे भाषा आणि गणित या विषयातील आकलन तपासून पाहण्यासाठी गेली चार वर्षे होत असलेल्या मूल्यमापन चाचणीसाठी (बेसलाइन टेस्ट) प्रश्नपत्रिका कमी पडत असल्याने त्यांच्या झेरॉक्स काढण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येते आहे. त्या काढताना पेपर फुटण्याची भीती आहे, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.
पुण्यातील महाराष्ट्र प्राधिकरणामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ही संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाते. ती परीक्षा ६ आणि ७ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी शाळांना सरकारकडून पुरवल्या गेलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थी संख्येनुसार नाहीत. दरवेळी त्या कमी पडतात. त्यामुळे त्यांची झेरॉक्स काढावी लागते. त्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता असल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला. शाळांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स खाजगी झेरॉक्स सेंटरमधून काढून घ्याव्या लागतीत. तेथून किंवा त्यादरम्यानच्या प्रवासात कोठेही हे पेपर फुटू शकतात. त्याबाबत वेळोवेळी शिक्षण विभागाला सांगितले; तरीही फरक पडला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा घेतल्या जातात. आधीच्या वर्षातील अभ्यासक्रमावर त्या आधारित असतात. त्यातून मुलांचे भाषा आणि गणिताचे आकलन त्यातून तपासले जाते. पहिली व दुसरीसाठी २० गुण, तिसरी व चौथीसाठी ३० गुण, पाचवीसाठी ४० गुण, तर सहावी ते आठवीपर्यंत ५० गुणांची ही परीक्षा असते.
या चाचणीसाठी शैक्षणिक विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रश्नपत्रिका पुरेशा नसल्याने पेपरफुटीचा धोका वाढतो. त्यामुळे हा खर्च क्षणात वाया जाऊ शकतो, याकडे मुख्याध्यापकांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
प्रश्नपत्रिका मिळतील : दहीतुले
विद्यार्थी संख्येनुसारच या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांत प्रश्नपत्रिका कमी आहेत, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे गट शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी सांगितले.
बीएआरसीमध्ये प्रश्नपत्रिका वाटप सुरू आहे. ज्यांना कमी पडत आहेत, ते तिथून प्रश्नपात्रिका घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Depth of Paperfood Depreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.