नेत्यांनी शांत रहायच आणि इतरांना...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:21 PM2022-11-10T15:21:43+5:302022-11-10T15:43:17+5:30
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. काल मुंबईत शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत केले.
मुंबई-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. काल मुंबईत शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत केले. आज संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले, त्यांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. लवकरच मी त्यांची भेट घेणार आहे, असं राऊत म्हणाले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
"संजय राऊत काय बोलले हे मी काही ऐकले नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. पण, मी सगळ्यांना भेटत असतो. राजकारणातील कटुता दूर करायची असेलतर सगळ्यांना धरुन ठेवायचे असते. नेत्यांनी शांत रहायच आणि इतरांना बोलायला लावायच ही पद्धत बंद करायला पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आता ईडी हायकोर्टात गेले आहे. आता हायकोर्ट काय निर्णय घेते ते पाहू मी यावर आता काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले, त्यांची भेट घेणार; संजय राऊत यांचं महत्वाचं विधान!
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते १०३ दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी संजय राऊत यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हा मी तुरुंगात होतो. पण देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातलं सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...
"राज्यातील राजकीय कटुता संपवली पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्याचं मी स्वागत करतो. राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवात आहेत. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे अधिकार आम्ही काढले होते ते फडणवीसांनी पुन्हा बहाल केले असे काही निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.