एमपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:54 AM2024-08-23T07:54:24+5:302024-08-23T07:54:38+5:30

आयोगाने राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश केला नव्हता. त्यामुळे संतप्त परीक्षार्थींनी पुण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis had requested the postponement of the MPSC preliminary examination  | एमपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती विनंती 

एमपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती विनंती 

मुंबई : एकाच दिवशी २५ ऑगस्ट रोजी आलेली बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा न झालेला समावेश या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेत आयोगाने रविवारी होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.  

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती विनंती 
आयोगाने राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश केला नव्हता. त्यामुळे संतप्त परीक्षार्थींनी पुण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. खासदार सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी अध्यक्षांना परीक्षार्थींच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयोगाच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis had requested the postponement of the MPSC preliminary examination 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.