Maharashtra Political Crisis: “छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:51 PM2022-07-05T14:51:00+5:302022-07-05T14:52:23+5:30

Maharashtra Political Crisis: नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

deputy chief minister devendra fadnavis warm welcome in nagpur by bjp | Maharashtra Political Crisis: “छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Political Crisis: “छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Next

नागपूर: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठीच गर्दी केली होती. 

देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले आहे. गेल्या अडीच वर्षांत खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. नेमके कोण राज्य चालवत होते, तेच समजत नव्हते, अशी टीका करताना, सर्वोच्च न्यायालयात आम्ही योग्य ती बाजू मांडू. आम्ही योग्य काम केले असल्याने योग्य निकाल येईल. पण आता न्यायालयावर टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर स्वागत केल्यानंतर मिरवणुकीचे हॉटेल प्राइड चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाकांची आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते स्कूटर मिरवणूक काढत सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनाचे फलक लागले आहेत. यावर त्यांचा देवमाणूस असा उल्लेख करण्यात आला आहे. 
 

Web Title: deputy chief minister devendra fadnavis warm welcome in nagpur by bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.