उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:02 AM2022-07-13T11:02:26+5:302022-07-13T11:03:12+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून मनसे-भाजपा यांची जवळीक वाढली आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis will meet MNS president Raj Thackeray today | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

googlenewsNext

मुंबई - राज्यात घडलेल्या सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. दुपारी फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची बातमी आहे. अलीकडेच विधानसभा सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी त्यांना लिहिलेल्या पत्राचं कौतुक करत त्यांचे फोन करून आभार मानल्याचं सांगितले होते. त्याचसोबत लवकरच मी त्यांना भेटायला जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितले. 

त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेत घडणाऱ्या या घडामोडीत मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

आज रंगशारदा सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र मंगळवारी राज ठाकरेंनी पत्रक काढून पावसामुळे हा मेळावा पुढे ढकलत असल्याचं सांगितले. त्यामुळे मनसेचा आजचा मेळावा रद्द झाला. त्यात आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होत आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जातायेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मी राज ठाकरेंना आभार मानण्यासाठी, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटणार आहे त्याचे वेगळे अर्थ काढू नका असं म्हटलं होते. 

मनसेची भाजपा-शिंदे सरकारला साथ
विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार असल्याने संख्याबळात वाढ व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून सरकारला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरेंनी यांनीही विनंतीचा मान राखत विधानसभा अध्यक्ष निवडीत आणि सरकारच्या बहुमत चाचणीवेळी मनसेचे १ मत शिंदे-भाजपा सरकारच्या पारड्यात टाकलं होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे-भाजपा यांची जवळीक वाढली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून फडणवीस-राज ठाकरेंमध्ये काय चर्चा होतेय का हे पाहणंही तितकेच महत्त्वाचे आहे. 
 

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis will meet MNS president Raj Thackeray today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.