होय! आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, कारण...; देवेंद्र फडणवीसांचं सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 02:14 PM2023-08-17T14:14:05+5:302023-08-17T14:15:14+5:30
मी पुन्हा येईन या वाक्याची दहशत अजून पाहायला मिळते अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली.
शिर्डी - आज एक मजबूत सरकार आहे. काही लोकं दिवसा स्वप्न पाहत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका करतात. होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे कारण आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर केली तर त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम हे दोन्ही उपमुख्यमंत्री करतील असं सणसणीत प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री २४ तास काम करतात. संवेदनशील काम करतात. इर्शाळवाडीत दुर्घटना घडली, जिथे प्रशासन पोहचत नव्हते तिथे पायपीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले. त्यामुळे आम्ही तिघे एकत्रित आलोय. शिंदेंच्या कामाची शैली आणि अजित पवार आणि माझं तुम्हाला माहिती आहे. आम्ही तिघे एकत्रित आलोय त्या जोडीचा जवाब नाही असंही त्यांनी सांगितले.
🕐1.05pm | 17-8-2023📍Shirdi | दु. १.०५ वा | १७-८-२०२३📍शिर्डी.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 17, 2023
LIVE | ‘शासन आपल्या दारी’ अभियान.@mieknathshinde@AjitPawarSpeaks#शासनआपल्यादारी#Shirdi#Maharashtrahttps://t.co/YXbA9vliCD
शरद पवारांवर निशाणा
मी पुन्हा येईन या वाक्याची दहशत अजून पाहायला मिळते. काल राष्ट्रीय नेते म्हणाले फडणवीसांनी मी पुन्हा येईन म्हटलं. आता मोदीजी म्हणतायेत. मी ज्यावेळी म्हणालो मी पुन्हा येईन. लोकांनी पुन्हा मला आणले होते. परंतु काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून मी येऊ शकलो नाही. पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो. त्यामुळे शंका ठेवण्याचे कारण नाही असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर साधला.
त्याचसोबत या देशाला मोदींनी उच्च शिखरावर नेले. गरीब कल्याण अजेंडा मोदींनी दिला. केवळ भारतीयांचा आणि शेवटच्या माणसाच्या उद्धाराचा विचार करतात. देश त्यांच्यासोबत उभा राहील. पुढच्या १५ ऑगस्टला त्यांचेच भाषण लाल किल्ल्यावरून होईल यात शंका नाही असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.