ज्यांनी बाहेर राहून अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो, फडणवीसांची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 11:55 AM2022-07-04T11:55:51+5:302022-07-04T11:57:13+5:30
deputy cm Devendra Fadnavis thanks floor test eknath shinde bjp maharashtra government congress leaders absent for voting ashok chavan : विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानादरम्यान विरोधकांतील काही जण अनुपस्थित होते.
विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. बहुमत चाचणीदरम्यान ज्यांनी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो असं म्हणत सभागृहात तुफान फटकेबाजी केली.
“ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मतांनी पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली. त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो,” असं म्हणत फडणवीसांनी सभागृहात टोलेबाजी गेली. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले, कर्मावर अढळ निष्ठा असलेले असं व्यक्तीमत्व म्हणजे एकनाथ शिंदे. ते एक कुशल संघटक आहेत, पण ते जनतेचे सेवकही आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या प्रभावामुळे १९८० च्या दशकात त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम सुरू केलं. एखादा साधा कार्यकर्ता, शाखाप्रमुख असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी सांभाळली. आनंद दीघेंनी १९८४ मध्ये आनंद दीघे यांनी शिंदेंची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सामान्य माणसाला न्याय देण्याकरत ते आंदोलन करायचे, असंही त्यांनी अभिनंदनपर प्रस्तावात म्हटलं.
जितकं शिंदे सरकारसाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता तितकाच तो विरोधी पक्षांसाठी महत्त्वाचा होता. कारण आपल्याकडे बहुमत नसलं तरी प्रत्येक मताची किंमत अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे अशा महत्वाच्या क्षणी वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं ठरतं. पण आज काँग्रेसच्या लेटलतीफ आमदारांमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे पाच आमदार आज बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्यानं त्यांना मतदानाला मुकावं लागलं. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचाही समावेश होता.
काँग्रेसचे पाच आमदार अनुपस्थित
विधानसभा अध्यक्षांनी बहुमत ठराव मांडला आणि यावेळी आमदारांची शिरगणती करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. यावेळी शिरगणती सुरू होण्याआधी दोन वॉर्निंग बेल दिल्या जातात. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे आतून बंद करण्यात येतात. पण काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाचे दारबंद झाल्यानंतर विधानभवनात पोहोचले. त्यामुळे या आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप देखील उशीरा पोहोचले. त्यामुळे त्यांनाही मतदान करता आलेलं नाही.