ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलीस कोठडी
By प्रसाद गो.जोशी | Published: November 16, 2023 03:42 PM2023-11-16T15:42:54+5:302023-11-16T15:43:32+5:30
अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्या वर रक्कम गेली होती.
- चंद्रकांत सोनार
मालेगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी मालेगावी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी अद्वय हिरे यांना भोपाळमध्ये अटक करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात हिरे यांना मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
बँकेकडून सरकारी वकील ॲड. के.आर. वसीम व ॲड. काळे यांच्यात तीन तास युक्तीवाद केल्यानंतर हिरे यांनी २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्या वर रक्कम गेली होती. त्यामुळे हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. हिरे हे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत अद्वय हिरे यांना झालेल्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला.