लंडनचे उपमहापौर मुख्यमंत्र्यांना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:54 AM2017-09-12T03:54:27+5:302017-09-12T03:54:54+5:30
लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणे, त्याला जोडणारी प्रभावी परिवहन व्यवस्था निर्माण करणे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी आदी संदर्भात चर्चा झाली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणे, त्याला जोडणारी प्रभावी परिवहन व्यवस्था निर्माण करणे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी आदी संदर्भात चर्चा झाली.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबई शहरात प्रभावी आणि सुलभ परिवहन व्यवस्था, परवडणारी घरे आणि स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी लंडन शहराने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राजेश अग्रवाल म्हणाले, लंडन शहरात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी स्वतंत्र चिफ डिजिटल आॅफिसर नेमण्यात आला आहे. सध्याच्या मुलभूत सुविधा वापरूनच शहराची डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटी, परवडणारी घरे, सक्षम परिवहन व्यवस्था यासह विविध क्षेत्रात महाराष्ट्रातील शहरांशी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. दोन्हीकडील वेगवेगळ्या नवकल्पनांचे आदान - प्रदान करण्यात येईल.
यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन, प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासह लंडनमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.