देसाई यांच्यासह १८ जण जामिनावर सुटले

By admin | Published: June 5, 2016 12:56 AM2016-06-05T00:56:17+5:302016-06-05T00:56:17+5:30

अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात झालेल्या मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी, तसेच बेजबाबदारपणा करणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना निलंबित

Desai and 18 others were released on bail | देसाई यांच्यासह १८ जण जामिनावर सुटले

देसाई यांच्यासह १८ जण जामिनावर सुटले

Next

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात झालेल्या मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी, तसेच बेजबाबदारपणा करणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना निलंबित करावे, या मागणीसाठी पोलीस ठाण्याजवळ ठिय्या आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह १८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. ‘मंदिरात आम्हाला मारहाण करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करा, मगच आम्हाला अटक करा,’ असा आक्रमक पवित्रा अटक करतेवेळी देसाई यांच्यासह अन्य महिलांनी घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, अटक केलेल्या सर्वांची न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर सुटका केली.
अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून देसाई यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १३ एप्रिल २०१६ ला मंदिरात आंदोलन केले होते. त्या वेळी देसाई यांना गाभाऱ्यात मारहाण झाली होती.
या प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)

अटक करण्यास टाळाटाळ
उर्वरित आरोपींना अटक करावी, अशी मागणी देसाई यांनी पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे केली होती, पण देशमुख यांनी उर्वरित आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली असल्याने, तृप्ती देसाई यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे
तृप्ती प्रशांत देसाई ( रा. धनकवडी, पुणे), मनिषा राहुल टिळेकर, कांतिलाल सीताराम गवारे, शहनाज निसार शेख (रा.भवानी पेठ, पुणे), बिस्मिला शब्बीर कागदे, मदिना जहॉँगीर सनदी, वहिदा रफिक सनदी, सबीना इस्माईल सनदी, फरजाना रशीद सनदी (सर्व रा. घुणकी, ता. हातकणंगले.), आनंदी प्रकाश पाटील, मंगल बबन ओंकार, अमीर गुलाब मुल्ला, झाकीर अल्ताफ शेख, शाहरुख अकबर सनदी (तिघे रा. वडणगे, ता. करवीर), माधुरी सुरेश शिंदे (रा. उदगाव, ता. शिरोळ.), आशा सुरेश गाडीवडर (रा. जयसिंगपूर, ता. हातकणंगले)

Web Title: Desai and 18 others were released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.