जीवा महाला यांचे वंशज जगतायत हलाखीत
By Admin | Published: July 4, 2017 04:08 PM2017-07-04T16:08:22+5:302017-07-04T16:08:22+5:30
होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे आपण इतिहास वाचताना समजून घेतले पण जीवा महालाचे तेरावे वंशज सध्या हलाखीत जीवन जगत आहेत.
style="text-align: justify;">आनंद कांबळे /ऑनलाइन लोकमत
आपटाळे दि ४ - होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे आपण इतिहास वाचताना समजून घेतले पण जीवा महालाचे तेरावे वंशज सध्या हलाखीत जीवन जगत आहेत. शिवाजी ट्रेल संस्थेचे संस्थापक मिलींद क्षीरसागर सर व टीमने जीवा महालाचे वंशज प्रकाश व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
जीवा महालाचे तेरावे वंशज प्रकाश सपकाळ हे सातारा जिल्ह्यातील वाई जवळील कोढविंली येथे राहतात. प्रतापगडचे युद्ध हे स्वराज्य स्थापनेतील अतिशय म्हत्त्वाचा टप्पा होता. खुद्ध थोरले महाराज साहेब शहाजी राजे यांना नजरकैदेत तसेच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कपटाने मारणारा अफजल खान स्वराज्यावरती चालून आला होता. त्याला संपविण्याच्या उद्देशाने महाराजांनी त्याला प्रतापगडच्या पायथ्याला बोलावून त्याचा कोथळा काढला होता.
पण त्याचा अंगरक्षक व दांडपट्टा चालविण्यात पटाईत असणारा सय्यद बंडा महाराजांच्यावरती वार करता झाला त्यावेळी त्याचा वार पलटावून लावत "होता जीवा म्हणून वाचला शिवा" अशी म्हण प्रचलित करणारे जीवा महाले यांच्या वंशजांना मोल-मजुरी करून आपले पोट भरावे लागत आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णानदीच्या तीरावर कोंढीवली हे गाव आहे. याच गावात या वीर जिवा महालाचे १३ वे वंशज राहतात. प्रकाश बाळकृष्ण सपकाळ असे त्यांचे नाव आहे.
त्यांची पत्नी जयश्री व दोन मुले प्रतिक्षा, व प्रतीक यांच्यासोबत एका झोपडीमध्ये ते राहत आहेत. प्रकाश यांना पॅरेलिसीस असल्यामुळे ते अंथरुणावर खिळून आहेत. त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना गावात मजुरीला जावे लागते.
हि बातमी समजताच शिवाजी ट्रेलच्या टीमने आज कोंढवली गावात जाऊन प्रकाश यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याची हमी दिली. दुर्गपूजेच्या निम्मिताने २०१६ साला पासून शिवाजी ट्रेलने ऐतेहासिक घराण्यातील वंशजनां एकत्रित केले होते. या ऐतेहासिक घराण्यातील वंशज समजापुढे यावेत म्हणून शिवाजी ट्रेल प्रयत्नशील असून याच उपक्रमाअंतर्गत महाले यांना मदत करण्यात येणार आहे. शिवाजी ट्रेल ही संस्था किल्ले संवर्धनचे काम करते.जीवा महालाच्या वंशजाना मदत करण्याचे आवाहन संस्थेचे सदस्य प्रा. विनायक खोत यांनी केले आहे.