देशमुख पिता-पुत्रंची काँग्रेसला सोडचिठ्ठी

By admin | Published: October 2, 2014 01:11 AM2014-10-02T01:11:22+5:302014-10-02T01:11:22+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख यांनी बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला.

Deshmukh's father-son removed Congress | देशमुख पिता-पुत्रंची काँग्रेसला सोडचिठ्ठी

देशमुख पिता-पुत्रंची काँग्रेसला सोडचिठ्ठी

Next
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख यांनी बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला.
देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र आशिष यांनी भाजपाकडून काटोलमधून उमेदवारी दाखल केली आहे, तर 
त्यांचे दुसरे पुत्र डॉ. अमोल रामटेकमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. 
दोन पुत्र दोन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवीत असल्याने रणजित देशमुख यांच्यापुढे धर्मसंकट उभे ठाकले होते. त्यामुळे ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. 
अखेर बुधवारी त्यांनी त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठविला आहे.
प्रदेश काँग्रेसच्या भोंगळ कारभारामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला असून, दोनवेळा प्रदेशाध्यक्षपद भूषविणा:या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला ज्याप्रमाणो पक्षात वागणूक दिली जाते ती काँग्रेसच्या परंपरेला साजेशी नाही; त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असे देशमुख यांनी पत्रत नमूद केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत असल्याने नैतिक जबाबदारी म्हणून आपण  राजीनामा देत असल्याचे अमोल यांनी त्यांच्या राजीनामापत्रत नमूद केले आहे. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Deshmukh's father-son removed Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.