‘देशी’ची झिंग आता मिनीबारमध्ये
By यदू जोशी | Published: August 6, 2017 05:12 AM2017-08-06T05:12:14+5:302017-08-06T05:13:16+5:30
देशी दारू दुकानांसमोरील गुंडगिरी, व होणा-या त्रासाला आळा घालण्यासाठी देशी दारूच्या दुकानांचे रूपांतर ‘मिनी देशी दारू बार’मध्ये करण्यात येणार आहे.
मुंबई : देशी दारू दुकानांसमोरील गुंडगिरी, व होणा-या त्रासाला आळा घालण्यासाठी देशी दारूच्या दुकानांचे रूपांतर ‘मिनी देशी दारू बार’मध्ये करण्यात येणार आहे.
दुकानातून देशी दारू विकत घेऊन ती तिथे पिणाºयांची संख्या मोठी असते. त्यामुळे महिला, मुलींना संध्याकाळनंतर तेथून ये-जा करणेही शक्य होत नाही. तळीरामांचे ओंगळ प्रदर्शन तेथे दिसते. शिवाय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
हे थांबविण्यासाठी ‘देशी दारूचे बार’हा उपाय राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यास दुजोरा दिला.
राज्यात देशी दारूची ४ हजार २०० परवानाप्राप्त दुकाने आहेत. त्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील २,३०० दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद आहेत. ती स्थानांतरित करताना त्यांचे रूपांतर देशी दारू बारमध्ये करणे अनिवार्य असेल.
- देशी दारूच्या दुकानांच्या परवान्यांचे मार्चमध्ये नूतनीकरण होते. पुढील वर्षी बारचे स्वरूप दिल्यास नूतनीकरण होईल. सध्या देशी दारूच्या दुकानासाठी १६ चौरस मीटरची जागा बंधनकारक आहे. मिनीबारसाठी २५ चौरस मीटरचे बंधन घातले जाईल.
त्यामुळे तळीराम आत बसून दारू पिऊ शकतील.