आयडीसीमध्ये डिझायनिंगमधील पदवी

By Admin | Published: April 10, 2015 04:46 AM2015-04-10T04:46:52+5:302015-04-10T04:46:52+5:30

आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (आयडीसी)मध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून डिझायनिंगमधील दोन नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत

Designer degree in IDC | आयडीसीमध्ये डिझायनिंगमधील पदवी

आयडीसीमध्ये डिझायनिंगमधील पदवी

googlenewsNext

मुंबई : आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (आयडीसी)मध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून डिझायनिंगमधील दोन नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. बॅचलर आॅफ डिझाइन (बी.डीईएस) आणि मास्टर आॅफ डिझाइन (एम.डीईएस) हे चार आणि पाच वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम सुरू होत असून, या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ३१ मे रोजी घेण्यात येणार आहे.
आयडीसी सेंटरमध्ये यापूर्वी पदव्युत्तर ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण दिले जात होते. काळाची गरज ओळखून या क्षेत्रातील पदवी शिक्षण सुरू करण्याचा निर्णय सेंटरने घेतला आहे. पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असून, यासह इंटिग्रेटेड अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया १0 एप्रिलपासून सुरू झाली आहे.
आयडीसी प्रमुख प्राध्यापक बी.के. चक्रवर्ती म्हणाले, ‘भारतात डिझाइन क्षेत्रात कार्य करणाऱ्यांची फार गरज आहे. देशाच्या प्रगतीसाठी आणि सामान्यांचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी डिझाइन क्षेत्रात अधिकाधिक काम होणे गरजेचे आहे. आयडीसीमध्ये एम.डीईएस आणि पीएच.डी. प्रोग्राम आहेत. आता बॅचलर अभ्यासक्रमाची वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरेल.’

Web Title: Designer degree in IDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.