लाखावर मिळाली मते, तरी ५८ जणांचा पराभव: विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 09:30 IST2024-11-25T09:29:12+5:302024-11-25T09:30:22+5:30

पृथ्वीराज चव्हाण, थोरात, टिंगरे, थोपटे, धीरज देशमुखांचा समावेश 

Despite getting more than one lakh votes against the winning candidates in 58 constituencies in the state, 58 candidates were defeated. | लाखावर मिळाली मते, तरी ५८ जणांचा पराभव: विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलं

लाखावर मिळाली मते, तरी ५८ जणांचा पराभव: विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलं

राजाराम लोंढे

कोल्हापूर - विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाली असली, तरी अनेक मतदारसंघात काटाजोड लढती पाहावयास मिळाल्या. राज्यातील ५८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या विरोधात लाखापेक्षा अधिक मते घेऊनही ५८ जणांना गुलालापासून वंचित राहावे लागले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात, सुनील टिंगरे, संग्राम थोपटे, धीरज देशमुख, राम शिंदे आदींचा यात समावेश आहे. अशा उमेदवारांची संख्या पुणे, छ. संभाजीनगर जिल्ह्यात अधिक आहे.

लाखभर मते घेऊनही विजयाच्या गुलालापासून वंचित राहावे लागलेले उमेदवार असे...    

शरद पवार गट (२२) : सुभाष पवार (मुरबाड, ठाणे), सचिन दोडके (खडकवासला), प्रशांत जगताप (हडपसर), देवदत्त निकम (आंबेगाव), अशोक पवार (शिरूर), रमेश अप्पा थोरात (दौंड), राहुल कलाटे (चिंचवड), समरजीत घाटगे (कागल), मानसिंगराव नाईक (शिराळा), प्रभाकर घार्गे (माण), शशिकांत शिंदे (कोरेगाव), दीपक चव्हाण (फलटण), दिलीप खोडपे (जामनेर), माणिकराव शिंदे (येवला), राणी लंके (पारनेर), संदीप वर्पे (कोपरगाव), प्राजक्त तनपुरे (राहुरी), सतीश चव्हाण (गंगापूर), चंद्रकांत दानवे (भोकरदन), राहुल मोटे (परांडा), विजय भांबरे (जिंतूर), पृथ्वीराज साठे (केज).

काँग्रेस (१६) : पृथ्वीराज चव्हाण (कराड), संजय जगताप (पुरंदर), संग्राम थोपटे (भोर), ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण), राहुल पाटील (करवीर), भगीरथ भालके (पंढरपूर), कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), बाळासाहेब थोरात (संगमनेर), विलास औताडे (फुलंब्री), धीरज देशमुख (लातूर ग्रामीण), माणिकराव ठाकरे (दिग्रस), राहुल बोंद्रे (चिखली), गिरीश पांडव (नागपूर दक्षिण), सुरेश भोयर (कामठी), सतीश वारजूरकर (चिमूर), मनोहर पोरेटी (गडचिरोली).
उद्धवसेना (७) : के. पी. पाटील (राधानगरी), सत्यजीत पाटील (शाहूवाडी), राजू शिंदे (औरंगाबाद पश्चिम), सुरेश बनकर (सिल्लाेड), दत्ता गोर्डे (पैठण), विशाल कदम (गंगाखेड), डॉ. सिद्धार्थ देवळे (वाशिम).

भाजप (४) : राम सातपुते (माळशिरस), राम शिंदे (कर्जत-जामखेड), अर्चना पाटील (लातूर शहर), मदन येरावार (यवतमाळ), संग्रामसिंह देशमुख (कडेगाव पलूस).

अजित पवार गट (२) : सुनील टिंगरे (वडगाव शेरी), संजयकाका पाटील (तासगाव).
शिंदेसेना (१) : राजेंद्र राऊत (बार्शी).

इतर पक्ष/अपक्ष (७) : क्षितिज ठाकूर (बविआ-नालासोपारा), बाळाराम पाटील (शेकाप-पनवेल), रणजीतसिंह शिंदे (अपक्ष-माढा), असीफ रशीद (भासेपा-मालेगाव), जे. पी. गावित (माकप-कळवण), गणेश निंबाळकर (प्रहार-चांदवड).

शरद पवार यांच्या २२ उमेदवारांचा समावेेश
राज्यातील लाखापेक्षा अधिक मते घेऊन पराभूत झालेल्या ५८ पैकी तब्बल २२ उमेदवार हे शरद पवार गटाचे आहेत. त्यापाठोपाठ १६ उमेदवार काँग्रेसचे आहेत.

Web Title: Despite getting more than one lakh votes against the winning candidates in 58 constituencies in the state, 58 candidates were defeated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.