राज्यात अवैध वाहनांचा सुळसुळाट
By admin | Published: June 15, 2015 02:35 AM2015-06-15T02:35:15+5:302015-06-15T02:35:15+5:30
राज्यात अवैध वाहनांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून, तब्बल ३९ हजार ५६ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे परिवहन आयुक्त
मुंबई : राज्यात अवैध वाहनांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून, तब्बल ३९ हजार ५६ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. २0१३-१४ मध्ये केलेल्या कारवाईची आकडेवारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. त्यात ही बाब निदर्शनास आली. यात मुंबईत १ हजार ५३0 वाहने असल्याचे सांगण्यात आले.
परवाना नसताना किंवा लायसन्सचे नूतनीकरण न करताच नोंदणी न करताच अनेक वाहने रस्त्यावर धावतात. यामुळे राज्याच्या महसुलावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे सरकारी वाहतुकीलाही मोठा फटका बसतो. ही कारवाई परिवहन विभागामार्फत आरटीओ, वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने करण्यात येते. जवळपास १ लाख ९६ हजार ५६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अनधिकृत वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली असून, एकूण २ लाख ७0 हजारपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. यात मुंबई विभागात १ हजार ५३0 अवैध वाहनांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ठाण्यात ४ हजार ९८२, नाशिकमध्ये ६ हजार ७८५, पुण्यात ४ हजार ६८२, अमरावती विभागात ५ हजार ७४१ अवैध वाहनांचा
समावेश आहे. त्यानंतर नागपूर, औरंगाबाद या विभागांचा नंबर लागतो. (प्रतिनिधी)