विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

By admin | Published: July 7, 2017 04:25 AM2017-07-07T04:25:54+5:302017-07-07T04:25:54+5:30

एका पादचारी तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सिकंदर निसार शेख (२८, रा. राबोडी) आणि ठाणे स्थानक सॅटीस परिसरात अन्य एका तरुणीचा

Detention of the rickshaw-pulling rickshaw driver | विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका पादचारी तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सिकंदर निसार शेख (२८, रा. राबोडी) आणि ठाणे स्थानक सॅटीस परिसरात अन्य एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या शशिकांत सावंत (३०, रा. डोंबिवली) या दोघांनाही ठाणेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.
पहिली घटना बुधवारी रात्री ठाणे सॅटीस ब्रिजखाली घडली. ठाण्यातील कंपनीत नोकरीला असलेली २५ वर्षीय तरुणी घरी जाण्यासाठी सॅटीस पुलाखाली उभी असताना दादरच्या हेल्थ केअरमध्ये नोकरीला असलेल्या शशिकांतने विनयभंग केल्याचा आरोप तिने केला. आपला या तरुणीला चुकून धक्का लागल्याचा दावा त्याने केला. तो नशेत असल्याने त्याने जाणूनबुजून विनयभंग केल्याचा आरोप करून या तरुणीने त्याच्या श्रीमुखातही लगावली. त्याचवेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
दुसऱ्या घटनेत राबोडीच्या शिवाजीनगर येथील सिकंदर शेख या रिक्षाचालकाने नौपाड्यातील २५ वर्षीय तरुणीला अलोक हॉटेलच्या जवळ रात्री नजरेने इशारा करून विनयभंग केला. तिने याचा जाब विचारत त्याच्या श्रीमुखात लगावली. त्याने चूक कबूल करण्याऐवजी या तरुणीलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिनेही न डगमगता त्याचा प्रतिकार करून आरडाओरडा केल्याने नागरिकांनीही त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Web Title: Detention of the rickshaw-pulling rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.