रस्त्यावरील खड्डयामुळे मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलिसाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 11:30 AM2017-09-07T11:30:09+5:302017-09-07T12:15:27+5:30

मागच्या आठवडयात गुरुवारी संतोष शिंदे यांच्या दुचाकीचा  वाशी गाव सिंग्नल ब्रिजजवळच्या रस्त्यावर अपघात झाला होता.

Deteriorating policeman killed in Mumbai Police | रस्त्यावरील खड्डयामुळे मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलिसाचा मृत्यू

रस्त्यावरील खड्डयामुळे मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलिसाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देस्त्यावरील खड्डे आणि तेथे असलेल्या अंधारामुळे शिंदे यांच्या दुचाकीला अपघात झाला1996 साली पोलीस दलात भरती झालेले संतोष शिंदे एक कर्तबगार पोलीस कर्मचारी होते.

मुंबई, दि. 7 - मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलीस कर्मचारी संतोष एकनाथ शिंदे यांचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. ते 42 वर्षांचे होते. मागच्या आठवडयात गुरुवारी संतोष शिंदे यांच्या दुचाकीचा  वाशी गाव सिंग्नल ब्रिजजवळच्या रस्त्यावर अपघात झाला होता. ते मुंबईहून नेरुळला चालले असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. 

रस्त्यावरील खड्डे आणि तेथे असलेल्या अंधारामुळे शिंदे यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना लगेचच नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर सातारा आसगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

1996 साली पोलीस दलात भरती झालेले संतोष शिंदे एक कर्तबगार पोलीस कर्मचारी होते. त्यांना पोलीस आयुक्तांकडून  बेस्ट डिटेक्शन म्हणून चारवेळा गौरविण्यात आले होते. त्यांना एकूण 128 पोलीस बक्षीसे मिळाली होती. संतोष शिंदे यांना एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई असा परिवार आहे. मुलगा विघ्नेश तेरा वर्षांचा तर, मुलगी सई आठ वर्षांची आहे. या अपघातानंतर वाशी पोलीस ठाण्यात कलम 337,338 भा द वि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Deteriorating policeman killed in Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात