दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार: भारत-चीन सैन्याचा संयुक्त सराव

By Admin | Published: November 17, 2016 01:35 AM2016-11-17T01:35:36+5:302016-11-17T01:35:36+5:30

भारत आणि चीन या दोन्ही देशांसमोर दहशतवादाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दहशतवादाचा बीमोड करायचा असेल, तर दोन्ही देशांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे.

Determination to overcome terrorism: India-China joint military exercise | दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार: भारत-चीन सैन्याचा संयुक्त सराव

दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार: भारत-चीन सैन्याचा संयुक्त सराव

googlenewsNext

पुणे : भारत आणि चीन या दोन्ही देशांसमोर दहशतवादाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दहशतवादाचा बीमोड करायचा
असेल, तर दोन्ही देशांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन्ही देशांचा संयुक्त लष्करी सराव अत्यंत उपयुक्त ठरेल. या सरावातून एकमेकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शांतता प्रस्थापित करता येऊ शकेल, असा निर्धार भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला. भारत आणि चीन यांच्या संयुक्त लष्करी सराव २०१६च्या माध्यमातून जगापुढे वेगळा आदर्श निर्माण करता येऊ शकतो, अशी आशाही या वेळी व्यक्त करण्यात आली. ‘भारत-चीन ट्रेनिंग एक्सरसाईज हँड इन हँड २०१६’ या उपक्रमाच्या सहाव्या पर्वाचे बुधवारी पुण्यात उद्घाटन झाले. या वेळी जवानांचे पथसंचलन, निशानटोली, थरारक प्रात्यक्षिके यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या वेळी भारताचे मेजर जनरल योगेशकुमार जोशी आणि चीनचे मेजर जनरल वांग हायजीआंग हे मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी दोन्ही देशांतील राष्ट्रगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
संयुक्त लष्करी सरावाचे हे सहावे वर्षे आहे. हा उपक्रम भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये संलग्नपणे राबवला जातो. १६ ते २७ नोव्हेंबरदरम्यान हा सराव पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दक्षिण आशियाई देशांमध्ये शांतता, स्थैैर्य आणि समृद्धी
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत आणि चीनच्या भौगोलिक परिस्थितीत साधर्म्य आहे. त्यामुळे दहशतवादाचा सामना करताना एकमेकांना साहाय्य करता येईल.
सरावादरम्यान हेलिबॉर्न आॅपरेशन, एकमेकांची शस्त्रे हाताळणे, एक्सप्लोझिव्ह उपकरणांची माहिती घेणे, लढा देण्याच्या दृष्टीने करण्यात येणारी तयारी आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत होतील, अशी माहिती भारताचे लष्कराचे अधिकारी अलोक चंद्रा आणि चीनचे चांग चियालिंक यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Determination to overcome terrorism: India-China joint military exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.