सेंद्रीय शेती विकसित करणार

By admin | Published: January 19, 2015 12:52 AM2015-01-19T00:52:24+5:302015-01-19T00:52:24+5:30

सेंद्रीय शेती कशी विकसित करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. ग्राहकांना सेंद्रीय शेतीतून पिकविलेले धान्य, भाजीपाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

Developing organic farming | सेंद्रीय शेती विकसित करणार

सेंद्रीय शेती विकसित करणार

Next

नितीन गडकरी : पूर्ती सुपर बाजारच्या मनीषनगर शाखेचे उद्घाटन
नागपूर : सेंद्रीय शेती कशी विकसित करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. ग्राहकांना सेंद्रीय शेतीतून पिकविलेले धान्य, भाजीपाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. ही संधी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी रिटेलच्या क्षेत्रातील एक हेवीवेट कंपनी आमच्याशी जुळण्याच्या तयारीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
मनीषनगर येथील सेंट्रल इंडिया मध्यवर्ती बहुउद्देशीय सहकारी संस्थेतर्फे संचिलत पूर्ती सुपर बाजारचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान आणि विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ कोकण बँकेचे अध्यक्ष श्रीकांत कारापूरकर व महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, पूर्ती सुपर बाजारने ग्राहकांच्या हितासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पात २५० महिलांचे बचत गट संलग्न आहेत. ४५० गरीब महिलांना यातून रोजगार मिळाला आहे. समाजाने समाजासाठी चालविलेला हा उपक्रम आहे. पूर्तीच्या माध्यमातून छोट्या-छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊन रोजागाराचे दारे उपलब्ध करून दिली आहेत. राजकारणाचा उपयोग सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकारातून साकारलेल्या पूर्ती सुपर बाजारचा नफा कमाविण्याच्या उद्देश नाही, तर ग्राहकांना माफक दरात, दर्जेदार व योग्य वजनात वस्तू मिळाव्यात ही पूर्तीची मूळ संकल्पना आहे. सहकारात प्रामाणिकता हा निकष आवश्यक आहे. पूर्ती सुपर बाजाराने हा निकष पाळल्यामुळे त्यांची उलाढाल येत्या पाच वर्षात शंभर कोटी पर्यंत जाईल. येत्या काळात पूर्ती बाजारच्या शाखा संपूर्ण राज्यासोबतच इतर राज्यातही असतील असा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पासवान म्हणाले, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने आम्ही संशोधन सुरू केले आहे. ग्राहकांच्या संरक्षणासाठी लवकरच आवश्यक पावले उचलल्या जातील. सर्वसामान्यांचा विकास साधायचा असेल तर सहकार हे क्षेत्र मोठे आहे. या क्षेत्रात राहून तुम्हाला ग्राहक, शेतकरी व इतर वर्गाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर व महाराष्ट्र देशात क्र मांक एक वर राहील अशी खात्री आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक पूर्ती सुपर बाजारचे अध्यक्ष रवी बोरटकर यांनी केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून मुख्यमंत्र्यांनी पूर्ती बाजारचे उद्घाटन केले. या कार्यक्र मास आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, माजी महापौर संदीप जाधव, देवदत्त मराठे, दीपक सप्तर्षी उपस्थित होते.
कार्यक्र माचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार पूर्ती सुपर बाजारचे सचिव राजू हडप यांनी मानले. कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणाताई खानोलकर, सशांक काटकर, राजेश रामटेके, विश्वजीत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: Developing organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.