दापचरीत पर्यटनाचा विकास करणार - महादेव जानकर

By admin | Published: November 8, 2016 02:06 AM2016-11-08T02:06:57+5:302016-11-08T02:06:57+5:30

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

Developing unpopular tourism - Mahadev Jankar | दापचरीत पर्यटनाचा विकास करणार - महादेव जानकर

दापचरीत पर्यटनाचा विकास करणार - महादेव जानकर

Next

सुरेश काटे , तलासरी
महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन ही दिले. निसर्गरम्य दापचरीतील पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने आपण त्याचा विकास करू , अशी ग्वाही देखील दिली.
जिल्ह्यातील दापचरी येथे दुग्धविकास प्रकल्पाच्या हजारो एकर पडिक असलेल्या जागेची त्यांनी पाहणी केली . १९६३ साली दापचरी येथे आदिवासींची २६०० हेक्टर जमीन हस्तांतरित करुन घेऊन मुंबई ठाण्याला मुबलक आणि चांगले दूध मिळावे म्हणून करोडो रूपये खर्च करुन डेअरीचा प्रकल्प उभारला. मात्र काही वर्षात त्याला उतरती कळा लागली. त्यानंतर ही शासकीय सहा ते सात हजार एकर जागा तसेच उभारण्यात आलेला दुग्धविकास प्रकल्प आणि त्यासाठी लागणारी महागडी सामग्री धूळखात पडली आहे. या संदर्भात आज त्यांनी ही पाहणी केली. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रकल्प पुन्हा उभा कसा करता येईल यादृष्टीने उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दुग्धविकास प्रकल्पात कोणाचे अतिक्रमण असल्यास ते कितीही बडे नेते असले तरी ते उठवले जाईल अशी ग्वाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जागा म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून मी तिचा विकास करणार, राज्याचे उत्पन्न वाढविणार असे ते म्हणाले. दापचरी प्रकल्पातील कृषिक्षेत्राचे सन १९७४-७५ मध्ये करारनामे करून घेऊन भाडेपट्टीवर भूखंडांचे वाटप करण्यात आले. शेतीसाठी बारमाही पाण्याचे आमिष दाखविल्याने अनेकांनी आपल्या नोकऱ्या, कामधंदे, शेतीवाडी सोडून कृषिक्षेत्र योजनेत भाग घेतला. कृषिक्षेत्र ताब्यात घेण्यापूर्वी जाचक असा करारनामा करून एक हेक्टर क्षेत्र, दोन खणी घर (सुमारे १८० चौ, फूट) बारागायी साठी गोठा इतके क्षेत्र प्रत्येकाला वाटप करण्यात आले. मात्र वाटप केलेले क्षेत्र पूर्णपणे विकसित नव्हते. तसेच शेतीसाठी पाण्याची सोय नसतांना देखील दापचरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून १२ संकरित गायी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी सुमारे ३६ हजार इतके कर्ज मंजूर केले. बंगलोर येथून गायी खरेदी करून देण्यात आल्या. दुधाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चांलविणाऱ्यांची फसवणूक केली गेली. शेतीला वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही व गायींना दापचरीचे हवामानही मानवले नसल्याने अपेक्षित दुध उत्पादन मिळाले नाही. पशुवैद्यकीय सुविधा न मिळाल्याने अनेक गाई मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या विम्याची भरपाईसुद्धा झाली नाही. सन अशा विविध मागण्या यावेळी त्यांच्याकडे करण्यात आल्या
आहेत.
त्याचप्रमाणे कृषिक्षेत्र धारकांनी १९७४ ते १९७८ या कालावधीत २० लाख ८५ हजार लिटर इतक्या दुधाचा पुरवठा शासनाला केला आहे. हे पाहता समस्या दूर झाल्या तर येथील दुग्धव्यावसायिक चांगली प्रगती करू शकतील, हे सिद्ध झाले आहे. असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

Web Title: Developing unpopular tourism - Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.