देशभरात वेलनेस सेंटर उभारणार
By admin | Published: November 4, 2016 01:08 AM2016-11-04T01:08:31+5:302016-11-04T01:08:31+5:30
समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतील.
Next
पुणे : समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतील. यामध्ये योग, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधींना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील सर्व ठिकाणी वेलनेस सेंटर उभारण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
कर्वे समाज संस्थेला भेट देऊन त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावाही घेतला. त्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद देशपांडे, सचिव शिवकुमार, खजिनदार दीपक जानोरीकर, संचालक डॉ. दीपक वालोकर व मधुकर पाठक उपस्थित होते. डॉ. वालोकर यांनी संस्थेचा इतिहास, उपक्रम, प्रकल्प यांविषयी माहिती दिली.
(प्रतिनिधी)