शहरांमध्ये वनांचा विकास
By admin | Published: June 6, 2016 02:52 AM2016-06-06T02:52:20+5:302016-06-06T02:52:20+5:30
हरित आच्छादन आणि वन्य जीव संरक्षणाची वाढती गरज लक्षात घेता देशभरातील २०० शहरांमध्ये ‘शहरी वन’ संकल्पना राबविण्यात येणार असून, या अंतर्गत वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याचा मानस आहे
मुंबई : हरित आच्छादन आणि वन्य जीव संरक्षणाची वाढती गरज लक्षात घेता देशभरातील २०० शहरांमध्ये ‘शहरी वन’ संकल्पना राबविण्यात येणार असून, या अंतर्गत वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याचा मानस आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणराज्य मंत्री (स्वतंत्र पदभार) प्रकाश जावडेकर यांनी दिली. यासाठी ज्या ठिकाणी पडीत वनजमीन आहे; ती तत्काळ वन खात्यातर्फे उपयोगात आणण्याचे प्रयत्न केले जातील, असेही जावडेकर यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवारी आयोजित ‘गो वाईल्ड-फॉर लाइफ’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. ते म्हणाले, २०० शहरांमध्ये शहरी वन प्रकल्पांतर्गत पुणे येथे ८० एकर जमिनीवर ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, हे क्षेत्र ‘शहरी जंगल’ म्हणून ओळखले जाईल. वन्य जिवांच्या संरक्षणाविषयी जावडेकर म्हणाले, आम्ही वन्य जीव संरक्षणासाठी संरक्षित मापदंड अवलंबिण्याला प्राथमिकता देत आहोत. आसाम येथील काझिरंगा नॅशनल पार्क येथील वन्य जीव संरक्षणासाठी ‘शूट अॅट साईट’चे आदेश लष्करी जवानांना दिले आहेत. त्यानंतर २४ शिकाऱ्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. तसेच कुठल्याही वन्य प्राण्याचे अवयव विकत घेऊ नका. जर अशा उत्पादनांना मागणी नसेल तर बाजारपेठ निर्माण होणार नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
माहितीपत्रकाचे प्रकाशन
१‘लिव्हिंग विथ लेपर्ड’ या माहितीपत्रकाचे प्रकाशन जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात जे लोक राहतात आणि ज्यांनी बिबट्याचा वावर आणि आक्रमण बघितले आहे, अशांना हे माहितीपत्रक उपयोगी आहे.२लोकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि शासकीय मदत घेऊन प्रत्येक शहराच्या ठिकाणी शहरी वन स्थापन करता येईल. त्यामुळे नागरिकांनी जास्तीतजास्त वृक्षारोपण करतानाचे फोटो, सेल्फी काढून ते ६ीि२ी’ा्री.ल्ल्रू.्रल्ल येथे पाठवावेत, असे आवाहन जावडेकर यांनी केले.