पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास- अजित पवार

By admin | Published: October 25, 2016 10:01 PM2016-10-25T22:01:16+5:302016-10-25T22:01:16+5:30

सोलापुरातही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता दिलात तर पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरच्या विकास घडवून आणण्याची माजी जबाबदारी

Development of Solapur on the lines of Pimpri-Chinchwad - Ajit Pawar | पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास- अजित पवार

पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास- अजित पवार

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 25 - आधी पिंपरी-चिंचवड ही कष्टक-यांची नगरी होती. नगरपालिकेनंतर ही नगरी महापालिका झाली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उड्डाण पूल, स्वच्छता, शिक्षण आदी अनेक प्रश्न मार्गी लागले. सोलापुरातही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता दिलात तर पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरच्या विकास घडवून आणण्याची माजी जबाबदारी असल्याचा शब्द माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.  
सोलापूर मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी सायंकाळी बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवनात घेण्यात आला. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर, माजी आमदार युन्नूसभाई शेख, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, नगरसेवक दिलीप कोल्हे, संतोष पवार, शंकर पाटील, कय्युम बुºहाण, विद्या लोलगे, अरुणा वर्मा यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मंडळी नेहमीच पवारसाहेबांवर विश्वास व्यक्त केला आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, १९९१ साली पिंपरी-चिंचवडकरांनी मला आमदार केले. मी या शहराच्या विकासाकडे जातीने लक्ष घातले. पुढच्या १० वर्षांमध्ये या शहराचा चेहरामोहरा बदलला. शहरातील गरिबांसाठी घरकूल योजना राबवली. ज्या काही मूलभूत गरज होत्या, त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आज प्रगत अन्  विकासाचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचे नाव आशिया खंडात झाले. सोलापुरातही अनेक प्रश्न आहेत. विडी कामगारांचे प्रश्न असतील, ड्रेनेज, पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न असतील, ते सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूरकरांनी राष्ट्रवादीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे. मनपात राष्ट्रवादीची सत्ता आली तर मागील पाच वर्षांमध्ये जेवढा विकास झाला त्याहून अधिक पटीने शहराचा विकास करुन दाखवेन.
शहर आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारसाहेबांना मनापासून साथ दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पवारसाहेबांनी प्रतिनिधीत्व केले आहे. विकासकामांचा निधी वाटप होत असताना सोलापूर जिल्ह्याला झुकते माफ देत चला, अशा सूचनाच पवारसाहेबांच्या असायच्या. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल आणि स्व. आर. आर. पाटील हे पालकमंत्री असताना जिल्ह्याला निधी मिळत रहायचा. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज सोलापुरात अनेक प्रश्न आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतभेद, मनभेद विसरुन कामाला लागावे. कुणाबद्दल गैरसमज ठेवू नका. ठेवलात तर विनाकारण अडचणी निर्माण होतील. ग्रामीण भागातील नगरपालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना शहरातील कार्यकर्त्यांनी मनापासून मदत करावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. 
महापौर, आयुक्त करतात तरी काय ?
शहरातील विविध प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष बैठक बोलावणार होतो. त्यासाठी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांना महापौरांचे एक पत्र द्या म्हणालो. डोंगरे यांचे पत्र आले. पण आजतागायत महापौरांनी पत्र दिले नाही. मनपा परिवहन खात्यातील ८७ बसच्या चेसी क्रॅक झाल्या. त्याबद्दल अशोक लेलॅन्ड कंपनीला मनपा आयुक्त साधा जाब विचारत नाहीत. महापौर, मनपा आयुक्त करतात तरी काय ? असा सवालही अजित पवार यांनी केला. 
चुकीच्या माणसाला प्रवेश देऊ नका-
राष्ट्रवादी पार्टी वाढवत असताना चुकीचा माणसाला पक्षात प्रवेश देऊ नका. जर चुकीचा माणूस पक्षात आला तर इतरांनी मला फोन करून तक्रार करावी, असे सांगताना अजित पवार यांनी स्वत:चा मोबाईल नंबरही सांगून टाकला. तुम्ही तक्रार केली तर मी लागलीच त्यात लक्ष घालेन. मी मनकवडा नाही. मला खरे बोललेले आवडते. दोन्ही बाजू पाहून तडकाफडकी निर्णय घ्यायला मी मागे-पुढे पाहणारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
अजित पवार म्हणाले....
राष्ट्रवादीत पक्षात सन्मानाने पदे दिली जातात. इथे पदे विकली जात नाही.
एखादे काम का होत नाही. केल्याशिवाय होत नाही. माझ्याबरोबर फिरा, तुम्हाला अनुभव येईल.
मोदींच्या लाटेत नगरसेवक म्हणून कधीच निवडून न येणारे खासदार झाले. 
राज्यातील सरकारने पाण्याचे नियोजन केले असते तर शेतकºयांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले नसते. 
मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. 
 
 

Web Title: Development of Solapur on the lines of Pimpri-Chinchwad - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.