'देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा हेच सरकारचे खरे लाभार्थी' - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 04:29 PM2017-11-26T16:29:27+5:302017-11-26T16:29:50+5:30

मी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्याच्या आजही मोठ्या समस्या आहेत। त्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही.

'Devender Fadnavis and Chandrakant Dada are the true beneficiaries of the government' - Uddhav Thackeray | 'देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा हेच सरकारचे खरे लाभार्थी' - उद्धव ठाकरे

'देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा हेच सरकारचे खरे लाभार्थी' - उद्धव ठाकरे

Next

विटा : मी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्याच्या आजही मोठ्या समस्या आहेत। त्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही. जनतेने मते व सत्ता दिल्याने सरकार लाभार्थी असल्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी झाले असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील कार्वे (विटा) येथील शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, आ. अनिल बाबर, खासदार गजानन कीर्तीकर, नितीन बानूगडे-पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, संजय विभूते उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात नवीन काही तरी घडेल म्हणून जनतेने सरकार बदलले. पण परिस्थिती बदलली नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर सांगली जिल्हा भगवा करा. मी महाराष्ट्र भगवा करतो. मी मुख्यमंत्री होणार नाही, पण एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणारच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरणार आहे.

जनतेला अच्छे दिन येतील म्हणून बिजेपीला पाठींबा दिला. तीन वर्षे झाली. आता मी जेव्हा फिरतोय तेव्हा कळतंय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी खिल्ली उडवून ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आहे तेथेच आहे  त्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे. तीन वर्षांत कशात काही नाही. 1995 च्या जुन्याच पाणी योजना अजून पूर्ण करतोय. 

सरकारला नीट सल्ले देणारे कोणी नाही. वीजदर कमी करण्यासाठी दिलेल्या  मुख्यमंत्रीच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवितात. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे की नाही? शेतकरी हा राजा आहे. त्यांचा कोणी छळ करून स्वतःला राजा संजय असेल तर असले संस्थान खालसा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

Web Title: 'Devender Fadnavis and Chandrakant Dada are the true beneficiaries of the government' - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.