सर्वाचा देवेंद्र!
By admin | Published: October 29, 2014 02:43 AM2014-10-29T02:43:08+5:302014-10-29T02:43:08+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडलेले व कायद्याची पदवी घेऊनही राजकारणालाच आपले कर्मक्षेत्र बनविणारे फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत़
Next
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. विद्वत्ता अन् लोकप्रियतेचा मिलाप असलेले राजकीय व्यक्तिमत्त्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडलेले व कायद्याची पदवी घेऊनही राजकारणालाच आपले कर्मक्षेत्र बनविणारे फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत़ वॉर्डाचा नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आह़े नव्वदच्या दशकात राजकारणात प्रवेश केला अन् अल्पावधीतच त्यांनी
मोठा जनाधार प्राप्त केला. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक आंदोलने व चळवळ राबवून लोकांचे प्रश्न सोडविले. विधानसभेत व पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. प्रत्येक विषयावर मुद्देसूद बोलणारे ‘राजकीय फडणवीस’ व व्यक्तिगत आयुष्यात प्रत्येक क्षण भरभरून जगणारे ‘राजकारणापलीकडचे फडणवीस’ यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे
उलगडण्याचा हा प्रयत्ऩ़़
मोदी आणि
संघातील दुवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून फडणवीस यांची भूमिका मोलाची आणि तितकीच महत्त्वाची ठरणारी आहे. संघाचे मुख्यालय नागपुरात आहे आणि संघाच्या मुशीतच देवेंद्र यांची जडणघडण झाली आहे.
भारतातील दुसरे तरुण महापौर
नागपूर महापालिकेतून सलग दोनदा ते (1992 व 1997) निवडून आले. नागपूरचे महापौरपद त्यांनी भूषविले असून, भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे.
विदर्भातील चौथे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील चौथे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यापूर्वी मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी हे पद भूषविले आहे.
आमदारकीचा चौकार
1999 पासून आतार्पयत झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी सतत विजय मिळवला आहे. चौथ्यांदा जिंकताच त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले.
फडणवीस यांनी बालपणापासूनच राजकीय
प्रवास पाहिला. लहानपणीच त्यांची अटल बिहारी वाजपेयींसारख्या दिग्गज नेत्यासोबत भेट घडली. आता हा प्रवास राज्याचा मुख्यमंत्री होण्यार्पयत येऊन ठेपला आहे. या प्रवासात त्यांना घरच्यांची वेळोवेळी साथ लाभली. चांगल्या कार्यासाठी आईची कौतुकाची थापही पडली.
वडिलांचा समृद्ध वारसा
1968 साली नगरसेवक झाले. दुस:या टर्मला उपमहापौर झाल़े आणीबाणीत लागली व 18 महिने कारावास भोगावा लागला.
देवेंद्र यांच्या घडण्यात वडील गंगाधररावांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे. वडिलांकडून अनेक गुण देवेंद्र यांना वारसाहक्काने मिळाले आहेत. गंगाधरराव फडणवीस यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे झाला. शिक्षणासाठी ते नागपुरात काकांकडे आले. त्या वेळी काकांचे घर महाल परिसरात होते. महालातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.
घर संघाच्या कार्यालयाशेजारी असल्याने ते संघ विचारांशी जुळले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियमित स्वयंसेवक म्हणून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. संघ विस्ताराच्या कार्यासाठी ते दोन वर्षे ओरिसात राहिल़े येथेच मानसशास्त्रत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
वडील महिन्याला शंभर रुपये पाठवायचे, त्यात ते स्वत:सह दोन गरीब विद्याथ्र्याचाही सांभाळ करीत. त्यानंतर शिक्षकाची नोकरी केली, पण मन रमत नव्हते. नंतर राजकारणात उतरले व विविध पदांवर काम करताना जनसंघाची बांधणी केली. त्यांनी अनेक पक्षांचे चांगले लोक जनसंघात आणले. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली व त्यात सलग दोन वेळा जिंकले.
आई म्हणते..
पूर्णवेळ
प्रचारक
होण्यापासून
मीच थांबवले
देवेंद्रने नेतृत्व आणि वक्तृत्व हे गुण तर त्याचे वडील गंगाधरराव फडणवीसांकडूनच घेतले आहेत. त्याने त्याच्या बालपणापासूनच वडिलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले पाहिले. आणीबाणीच्या काळात वडील 11 महिने कारागृहात होते.
तेव्हा पाच वर्षाच्या देवेंद्रला फारसे कळत नव्हते, पण काहीतरी वेगळे घडतेय, असे त्याच्या बालमनाला वाटायचे. यातूनच त्याची विचारधारा पक्की होत गेली आणि कुमारवयात तो संघ विचारांशी जुळला.
संघाच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव असल्याने आजन्म ब्रrाचारी राहून पूर्णवेळ प्रचारक होण्याचा निर्णय त्याने घेतला होता़ पण त्याला त्या वेळी थांबविण्याचा निर्णय माझाच होता, अशी आठवण देवेंद्र यांची आई सरिता फडणवीस यांनी सांगितली.
पत्नी म्हणते..
सोबत फिरायला वेळच नाही
देवेंद्र आज मुख्यमंत्री होत असले तरी त्यांची ती महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. ज्या स्तरावर काम करता येईल तेथे काम करीत राहायचे, हा त्यांचा स्वभाव आहे. पण लोकप्रिय नेता या भूमिकेपलीकडे पती म्हणून देवेंद्र फारसे सापडत नाहीत.
सातत्याने कामात आणि घराबाहेर असल्याने त्यांच्याशी भेट होत नाही़ विवाहानंतर मधुचंद्र वगळता आम्ही दोघे कुठेच एकटे फिरायला गेलो नाही. पण मित्रंच्या ग्रुपसोबत अनेक हिल स्टेशन्स, चिखलदरा व ऑस्ट्रेलिया, न्यूङिालंड, युरोपला फिरून आलो. पुढे राजकारणात व्यस्त झाल्याने असा योग आला नाही़
आता ते मुख्यमंत्री होत आहेत, पण मला कुठलीही खंत नाही़ त्यांची ही व्यस्तता राज्यहिताची आहे. म्हणून आम्ही तडजोड स्वीकारली आहे, असे मत देवेंद्र यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
परिचय
फडणवीसांचा
नाव : देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
पत्ता : 276, आर.एस. फडणवीस पार्क धरमपेठ, नागपूऱ 44क्क्1क्
जन्म : 22 जुलै, 197क्
पत्नी : अमृता फडणवीस (व्यवस्थापक, अॅक्सिस बँक, नागपूर)
मुलगी: कु. दिविजा फडणवीस
शिक्षण : एमबीए, डीएसई
विधिमंडळातील कार्य
अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरविकास, गृहनिर्माणविषयी स्थायी समिती, राखीव निधींविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती यात फडणवीस यांनी आपले योगदान दिले आह़े
राजकीय कारकिर्द
1992-2001
सलग दोन टर्म नागपूर महानगरपालिकेचे सदस्य
1997 मध्ये नागपूरचे महापौर झाले. (नागपूर महानगर पालिकेच्या इतिहासात सर्वाधिक तरुण महापौर व भारतातील दुस:या क्रमांकाचे तरुण महापौर)
पुन्हा निवडणूक जिंकून महाराष्ट्रातील पहिले मेअर इन कौन्सिलचे महापौर
1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून सलग आमदार आहेत़
पुरस्कार
कॉमनवेल्थ पार्लमेंटरियनतर्फे वर्ष 2क्क्2-क्3 साठीचा सवरेत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सवरेत्कृष्ट वक्ता पुरस्कार
रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग युथ विभागीय पुरस्कार
मुक्तछंद या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सवरेत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
नाशिक येथील पूर्णवाद परिवार- तर्फे राजयोगी नेता पुरस्कार.