'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 08:50 PM2022-09-16T20:50:38+5:302022-09-16T20:54:32+5:30

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Devendra Fadanvis slams ShivSena for opposing the refinery Project | 'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Next

मुंबई: वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. हा प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्रात येणार होता, पण ऐनवेळी तो गुजरातला हलवण्यात आला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपले मत मांडले, तसेच रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेवर टीकाही केली.

5 लाख लोकांना रोजगार मिळाला असता
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, '3 लाख 50 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. या गुंतवणुकीने 5 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो. सर्व शासकीय ऑईल कंपन्या आणि पार्टनर म्हणून मिडल ईस्टची कंपनी ही रिफायनरी उभारणार होते. गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगरच्या रिफायनरीचा आणि मुंद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. जामनगरच्या रिफायनरीपेक्षा चारपट मोठी रिफायनरी राज्यात आली असती.'

शिवसेनेमुळे मोठा प्रकल्प गेला
'ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. या रिफायनरीमुळे महाराष्ट्र खूप पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला शिवसेनेने विरोध केला, ती राज्यात होऊ दिली नाही. आम्ही त्यावर विचार कर आहोत, पण आता ती स्केल डाऊन झाली आहे. ती आता साडे तीन लाख कोटीची राहिली नाही. राज्यात होणारी एवढी मोठी गुंतवणूक सेनेने घालवली,' अशी टीका फडणवीसांनी केली. 

येत्या काळात नवीन प्रोजेक्ट आणू
'गुजरात भारतातील राज्य आहे, हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलो होते. पण, सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती, त्यामुळे अधिकचा आग्रह करता आला नाही.  पण, आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार,' असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले.

Web Title: Devendra Fadanvis slams ShivSena for opposing the refinery Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.