Devendra Fadnavis: भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का दिलं? देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 06:50 PM2022-07-23T18:50:58+5:302022-07-23T18:51:22+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालीली ही कार्यकारिणीची बैठक आपल्या भाषणाने गाजवली. यावेळी तुफान फटकेबाजी करत, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला.

Devendra Fadnavi important disclosure Why did BJP give Chief Ministership to Eknath Shinde | Devendra Fadnavis: भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का दिलं? देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा

Devendra Fadnavis: भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का दिलं? देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा

Next

मी एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करीन, एक हिंमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा, हा बाहेर पडला. ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा ठरलं नव्हतं सरकार येईलच, कदाचीत असेही घडले असते, की एवढे लोक नसते आले तर त्यांचे राजकीय सामाजिक जीवन, कमावलेली पुण्याई कदाचित समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. अशा शब्दात आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. एवढेच नाही, तर आपण मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा का केली, याचा खुलाही फडणवीस यांनी यावेळी केला. ते पनवेलमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालीली ही कार्यकारिणीची बैठक आपल्या भाषणाने गाजवली. यावेळी तुफान फटकेबाजी करत, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, त्यांनी (एकनाथ शिंदे) ठरवलं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशीच फारकत घेतली जात असेल, ज्यांच्यासोबत आम्ही लढाया केल्या त्यांच्याच अधिपत्याखाली आम्हाला काम करावं लागंत असेल, ज्यांच्याबद्दल स्वतः बाळासाहेब असं म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा माझ्या पक्षाचं दुकान मी बंद करेन. त्यांच्याच सोबत जर जावं लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सोबत जावं लागत असेल, एवढेच नाही, तर स्वा. सावरकरांचा रोज अपमान होत असताना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, दाऊदशी संबंधित प्रकरणात मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्या विरोधात अक्षर बोलता येत नाही. त्याला मंत्री पदावरून काढायची हिंमत नेते दाखवू शकत नाही. अशा परिस्थितीत जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता, तो हे सहन करू शकत नव्हता.

हे सत्तेसाठी नाही, विचारासाठी झालेलं परिवर्तन- 
फडणवीस म्हणाले, हे सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठी झालेले परिवर्तन आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हे आवश्यक होतं आणि अनेक कथा-कहाण्या तयार झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, ही घोषणा झाली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. हे अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. ते एवढे लोक घेऊन येत असताना, त्यांना नेतृत्व देणं महत्त्वाचं तर होतंच, पण त्याहूनही महत्वाचं होतं, तर भारतीय जनता पार्टी सत्तापिपासू नाही, आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो, अशांपैकी आम्ही नाही. तर आमची विचाराची लढाई आहे. आता जी मायनॉरिटीत आली आहे, त्या शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. आता एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना आहे. 

तेव्हा आमच्यासोबत षड्यंत्र झालं -
फडणवीस म्हणाले, 'त्या'  ठिकाणी कुठलाही शब्द दिलेला नव्हता (मुख्यमंत्रीपदासंदर्भात). मी स्वतः त्यांच्या सोबत बसलेलो होतो. आमच्यासोबत षड्यंत्र झालं. आमच्या जागा पाडण्यात आल्या. चंद्रकांतदादा, आपण भोळे लोक आहोत. युतीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून बंडखोर मागे घेतले. त्यांच्यासाठी हवी ती मदत केली. पण, त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. नंबर गेम फसतो की नाही, याची ते वाट बघत होते. निकाल यायच्या आधीच, आमचे सगळे मार्ग खुले आहेत, असे त्यांनी म्हटले होते. मी फोन करत होतो, पण ते फोन घेत नव्हते. कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत झाली, त्याच निर्णयात आजच्या परिस्थितीचं बीजारोपण, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavi important disclosure Why did BJP give Chief Ministership to Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.