"एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा धुर काढलाय...", चित्रा वाघ यांचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:13 PM2022-06-05T12:13:44+5:302022-06-05T12:14:06+5:30

'अकेला देवेंद्र क्या करेगा?' म्हणणाऱ्या नेत्यांचा चित्रा वाघ यांनी खरपुन समाचार घेतला आहे.

"Devendra Fadnavis alone fighting against you", Chitra Wagh criticizes the Maharashtra Government | "एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा धुर काढलाय...", चित्रा वाघ यांचे सरकारवर टीकास्त्र

"एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा धुर काढलाय...", चित्रा वाघ यांचे सरकारवर टीकास्त्र

Next

शिरुर: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अनेकदा टीका करीत असतात. आताही राज्यसभेच्या निवडणुकांवरुन सरकारमधील मंत्र्यांकडून फडणवीसांवर टीका होत आहे. 'अकेला देवेंद्र क्या करगा,' अशाप्रकारचे वक्तव्य सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडेतोर उत्तर दिले आहे. 

'अकेला देवेंद्र क्या करेगा..?'
शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे महिला मेळाव्यात बोलताना चित्रा वाघ म्हणाल् का, ''अकेला देवेंद्र क्या करेगा? अशी टीका महाविकास आघाडी सरकारमधील नेते करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद आहे, पण एकट्या देवेंद्र फडणवीसांनीच तुमच्या तिघांचा धुर काढलाय. आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय'', अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

'तिसरी जागाही आम्ही जिंकणार'
त्या पुढे म्हणाल्या की, "राज्यसभेच्या दोन जागा तर आम्ही जिंकणारच, मात्र तिसरी जागाही सहज जिंकू.'' यावेळी वाघ यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेवरही भाष्य केले. "राज्यातील सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिक जाण्यासाठी घाबरतोय. मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवत नाहीत, तर गोरगरीबांनी तरी कसा विश्वास ठेवायचा? कोरोना काळात राज्यातील नेत्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले, या नेत्यांची बिलही समोर आली," असेही त्या म्हणाल्या. 

Web Title: "Devendra Fadnavis alone fighting against you", Chitra Wagh criticizes the Maharashtra Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.