मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 02:16 PM2024-12-04T14:16:38+5:302024-12-04T14:17:02+5:30

Devendra Fadnavis CM Oath News: नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाल्याचे रुपानी यांनी सांगितले. तसेच दुपारी ३ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

Devendra Fadnavis CM Oath News: The High Command will decide in the evening whether the cabinet will be sworn in tomorrow or not; vijay Rupani's clue... | मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...

मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...

भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत आज देवेंद्र फडणवीस यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरु असलेल्या राजकारणाला विराम मिळाला आहे. थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचे भाजपाचे निरीक्षक विजय रुपानी यांनी सांगितले. 

संसदीय नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाल्याचे रुपानी यांनी सांगितले. तसेच दुपारी ३ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांचा उद्या, सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी आहे. महनीय व्यक्तींना निमंत्रण पत्रिकाही देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अशातच कोणाकोणाचा शपथविधी होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री की अन्य मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार यावरही रुपानी यांनी माहिती दिली आहे. 

अन्य मंत्रिमंडळाचा शपथविधी घेण्याबाबत आज सायंकाळी हायकमांडशी चर्चा केली जाणार आहे. यानंतर सर्व ठरणार आहे. परंतू, उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचे रुपानी यांनी स्पष्ट केले. यंदाचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावर घेतला जाणार आहे. 

५ वर्षांनी ते पुन्हा आले!
देवेंद्र फडणवीस हे राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्या राजकीय घडामोडीत अजित पवारांनासोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. परंतु अवघ्या ७२ तासांत त्यांना मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार व्हावे लागले. २०१९ मध्ये फडणवीसांनी निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच निर्धाराने अशी घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागले. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी मी पुन्हा येईन घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत. 

Web Title: Devendra Fadnavis CM Oath News: The High Command will decide in the evening whether the cabinet will be sworn in tomorrow or not; vijay Rupani's clue...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.