'राज्यपालांचे अधिकार कमी करणे योग्य नाही', देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 12:53 PM2021-12-26T12:53:22+5:302021-12-26T12:53:28+5:30

विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी घोषणा होऊ शकते. काँग्रेसकडे हे पद असल्याने हे पद कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis criticizes state government over governor Bhagat Singh Koshyari's rights | 'राज्यपालांचे अधिकार कमी करणे योग्य नाही', देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

'राज्यपालांचे अधिकार कमी करणे योग्य नाही', देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

googlenewsNext

नागपूर: राज्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा जोर धरत आहे. या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठीच्या नियमांमध्ये राज्य सरकारने बदल केले आहे. पण, त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकी संदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत, त्याबद्दल राज्यपाल निर्णय घेतीलच. पण, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात राज्यपालांच्या अधिकारांमध्ये जे बदल करण्यात आले आहेत, ते संविधानातील तरतुदींशी सुसंगत वाटत नाही. अशाप्रकारे राज्यपालांचे अधिकार कमी करणे आणि मंत्रिमंडळाचा सहभाग वाढवणे हे योग्य नाही, त्यामुळे भाजपा त्याचा विरोध करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारचा प्रस्ताव राज्यपालांच्या कोर्टात
राज्य सरकारने पाठवलेला विधानसभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी स्वीकारणार की नाकारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलले आहेत. आता सरकारने याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवला आहे. अजून त्यांनी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्ताव बघितला नसल्याची माहिती समोर आली आहे. 

उमेदवाराची आज घोषणा
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी घोषणा होऊ शकते. काँग्रेसकडे हे पद असल्याने हे पद कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे या चर्चेत आहेत. 

Web Title: Devendra Fadnavis criticizes state government over governor Bhagat Singh Koshyari's rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.