रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 04:01 PM2021-03-13T16:01:31+5:302021-03-13T16:03:10+5:30

Devendra Fadnavis elected as President of Rambhau Mhalgi Prabodhini : उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली.

Devendra Fadnavis elected as President of Rambhau Mhalgi Prabodhini | रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

Next
ठळक मुद्देआतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती.संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (Devendra Fadnavis elected as President of Rambhau Mhalgi Prabodhini)

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली.

Web Title: Devendra Fadnavis elected as President of Rambhau Mhalgi Prabodhini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.