Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 11:46 AM2020-02-20T11:46:06+5:302020-02-20T12:11:24+5:30

१५ हजारांच्या जातमुचलक्यावर फडणवीस यांना जामीन

Devendra Fadnavis gets bail in forgery and criminal defamation cases | Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

Next
ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा दिलासानागपूर न्यायालयाकडून फडणवीसांना जामीन मंजूर१५ हजारांच्या जातमुचलक्यावर फडणवीसांना जामीन

नागपूर: निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. न्यायालयानं फडणवीस यांना जामीन मंजूर केला आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून सन २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित फौजदारी खटल्यांची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ ए अन्वये खटला चालवण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल राखून ठेवला होता. 

नागपूर न्यायालयानं समन्स बजावल्यानं आज देवेंद्र फडणवीस न्यायालयासमोर हजर झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा नेते परिणय फुकेदेखील उपस्थित होते. न्यायालयानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला. यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. संबंधित केस संपल्यानं त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नव्हता, असं त्यांनी सांगितलं. 

'१९९५ ते ९८ दरम्यान आम्ही  झोपडपट्टी काढण्याच्या कारवाई विरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी माझ्याविरोधात दोन खासगी तक्रारी झाल्या. त्या संपल्या असल्यानं प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या नव्हत्या. न्यायालयानं या प्रकरणात पुढची तारीख दिलेली आहे,' असं फडणवीस म्हणाले. या सगळ्यामागे कोणाचा हात आहे याची मला कल्पना आहे. त्यावर योग्य वेळी बोलेन. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
 

Web Title: Devendra Fadnavis gets bail in forgery and criminal defamation cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.