देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 05:43 PM2024-11-15T17:43:42+5:302024-11-15T17:44:22+5:30

शरद पवार यांच्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आज भर पावसात सभा घेतली.

Devendra Fadnavis meeting in heavy rain; Said - "When the meeting is held in the rain, the seat is selected..!" | देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"

देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"

Devendra Fadnavis in Rain : महाराष्ट्रात निवडणुका आणि पावसाचं जुनं आहे. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागाल होता. त्या सभेची आजही राज्यात चर्चा असते. दरम्यान, आजचा(दि.15) दिवसदेखील पावसातील सभेमुळे चर्चेत राहणारा आहे. राज्यातील दोन दिग्गज नेत्यांनी आज भर पावसात सभा घेतल्या. 

"पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!" 
आज बत्तीस शिराळा इथं महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अचानक पाऊस सुरू झाला. या पावसातदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. "या ठिकाणी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुम्हाला सांगतो..आता सत्यजीत दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घोतोय ना? पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतेच. हे शुभ संकेत आहे," असं फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणतात, "काही नेत्यांचं म्हणणं आहे की, पावसात सभा झाली की निवडून येते. पण मी तुम्हाला सांगतो की, पाऊस पडो किंवा न पडो. पण मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सत्यजीत देशमुखांच्या रुपात आपल्याला सुसंस्कृत नेता आणि जमीनीवर काम करणारा नेता मिळाला आहे. वाकुर्डी बुद्रुकची योजना युती सरकारणे आणली होती. पण त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत योजना बंद पडली. त्याकाळी जयंत पाटील पालकमंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते, पण त्यांनी या प्रकल्पासाठी फुटकी कवडी दिली नाही. मी मुख्यमंत्री झालो आणि एका झटक्यात 100 कोटी रुपये या योजनेसाठी दिले," अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

शरद पवारांची पावसात सभा
शरद पवारांची आज इचलकरंजी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेवेळी पाऊस सुरू झाला, पावसात शरद पवारांनी आपलं भाषण पूर्ण केलं. "महाराष्ट्रात मी सभेला बोलायला उभा राहिलो तर की पावसाची सुरुवात होते. त्यात मी बोलल्यानंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो. मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली, त्यांचा 5 वर्षाचा अनुभव बघितला तर सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सत्तेत बदल करायचा असेल महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करून सरकार बनवण्याचं ऐतिहासिक काम उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला घ्यायचे आहे," असं शरद पवार यावेळी म्हणाले. 

Web Title: Devendra Fadnavis meeting in heavy rain; Said - "When the meeting is held in the rain, the seat is selected..!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.