फडणवीसांची नवी खेळी! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन ४५’, शिवसेनेच्या १० जागा रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:29 PM2022-06-17T12:29:47+5:302022-06-17T12:30:40+5:30

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असून, त्यासाठी आगामी १८ महिन्यांत एक मिशन राबविले जाणार आहे.

devendra Fadnavis new game BJP Mission 45 for Lok Sabha elections Shiv Sena 10 seats on radar | फडणवीसांची नवी खेळी! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन ४५’, शिवसेनेच्या १० जागा रडारवर

फडणवीसांची नवी खेळी! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन ४५’, शिवसेनेच्या १० जागा रडारवर

Next

मुंबई :

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असून, त्यासाठी आगामी १८ महिन्यांत एक मिशन राबविले जाणार आहे. त्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. शिवसेनेकडे असलेल्या १० जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मिशनचे समन्वयक माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदी उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री करणार राज्यात दौरे
ज्या जागा जिंकल्या आहेत, त्यावर आमचं लक्ष आहेच. मात्र, ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्र परिषदेत दिली. केंद्रातील काही मंत्री जुलैमध्ये या मिशन अंतर्गत राज्यात दौरे करणार असून, त्यात भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, आदींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे हे मतदारसंघ रडारवर
बुलडाणा- प्रतापराव जाधव, हिंगोली- हेमंत पाटील, पालघर- राजेंद्र गावित, कल्याण- श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, शिर्डी- सदाशिव लोखंडे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धैर्यशील माने. 

- गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती होती. राज्यात भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळविला होता. 
- २०२४ मध्ये राज्यात ४५ जागा जिंकण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. त्यासाठी निवडलेल्या १६ मतदारसंघांपैकी १० मध्ये सध्या शिवसेनेचे खासदार आहेत.

भाजपच्या या नेत्यांवर दिली जबाबदारी 
बुलडाणा - अनिल बोंडे, 
हिंगोली - राणा जगजीतसिंग, पालघर - नरेंद्र पवार, 
कल्याण - संजय केळकर, 
दक्षिण मध्य मुंबई - प्रसाद लाड, 
दक्षिण मुंबई - संजय उपाध्याय, 
शिर्डी - राहुल आहेर, 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - आशिष शेलार, 
कोल्हापूर - सुरेश हळवणकर, 
हातकणंगले - गोपीचंद पडळकर.

Web Title: devendra Fadnavis new game BJP Mission 45 for Lok Sabha elections Shiv Sena 10 seats on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.