Devendra Fadnavis: "विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल", महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 05:52 PM2023-01-05T17:52:16+5:302023-01-05T17:52:58+5:30
वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यामध्ये मोठी भूमिका बजावल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे भाजपकडून कौतुक होत आहे.
मुंबई: महावितरणचे खासगीकरण थांबवावे, या मागणीसाठी पुकारलेला संप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. एकूण 32 कर्मचारी संघटना या संपात सामील झाल्या होत्या. हा संप मागे घेण्यामध्ये मोठी भूमिका बजावल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे भाजपकडून कौतुक होत आहे. महाराष्ट्र भाजपने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.
विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल! pic.twitter.com/OtxAWdJaQJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 4, 2023
राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता, पण देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा संप काही तासांतच मागे घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक घेतली आणि यात सकारात्कम चर्चा झाली. . राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. या उलट पुढील तीन वर्षांत या तीन कंपन्यांमध्यये 50 हजार कोटींची गुंतवणूक राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती फडणवीसांकडून देण्यात आली. यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.
करून दाखवलेच! कारण हे #जनतेचे#आपलेसरकार ! pic.twitter.com/eh5GDoeYhb
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 5, 2023
भाजपने महावितरणचा संप मिटवल्यानंतर महाराष्ट्र भाजपने दोन ट्विट केले असून, यातून फडणवांचै कौतुक करण्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही टीकास्त्र डागले आहे. ''विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल!'' आणि ''करून दाखवलेच! कारण हे #जनतेचे #आपलेसरकार! महाविकास आघाडी सरकारला एसटीचा संप सहा महिन्यात मिटवता आला नाही, देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांचा संप अवघ्या 12 तासात सोडवला,'' असे ट्विट भाजपने केले.