मुख्यमंत्रीपद जाताच देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्या, बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:23 AM2019-11-29T10:23:25+5:302019-11-29T10:23:55+5:30
फडणवीस यांच्याविरुद्ध 1996 आणि 1998 मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल कऱण्यात आले होते. मात्र हे आरोप सिद्ध होऊ शकले नाही.
मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून देण्यात आलेल्या समन्सची नागपूर पोलिसांनी गुरुवारील अंमलबजावणी केली. निवडणुकीच्या शपथपत्रात फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे.
फडणवीस यांच्या घरी समन्स देऊन न्यायालयाच्या आदेशाची अंमबजावणी केल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली, जेंव्हा राज्यात शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध होऊ न शकले अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला.
फडणवीस नागपूरमधून आमदार आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने फडणवीस यांच्याविरुद्धच्या एका तक्रारीवर सुनावणी घेण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपनेते फडणवीस यांच्याविरुद्ध कथितरित्या माहिती लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील वकील सतीश उईके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती.
फडणवीस यांच्याविरुद्ध 1996 आणि 1998 मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल कऱण्यात आले होते. मात्र हे आरोप सिद्ध होऊ शकले नाही.