प्रादेशिक पक्ष काँग्रेसला वाटा देणार नाहीत, पुढेही इंडिया आघाडी चालणार नाही: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 03:55 PM2024-01-25T15:55:15+5:302024-01-25T15:55:20+5:30

Devendra Fadnavis On INDIA Alliance: इंडिया आघाडी अशी कुठलीच आघाडी नव्हती, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

devendra fadnavis reaction on india alliance clashes on seat allocation in lok sabha election 2024 | प्रादेशिक पक्ष काँग्रेसला वाटा देणार नाहीत, पुढेही इंडिया आघाडी चालणार नाही: देवेंद्र फडणवीस

प्रादेशिक पक्ष काँग्रेसला वाटा देणार नाहीत, पुढेही इंडिया आघाडी चालणार नाही: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On INDIA Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. तर आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावरून भाजपाकडून आता इंडिआ आघाडीवर टीका केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने यात पुढाकार घेतला. उद्योगपती आनंद महिंद्रा हे मुंबई फेस्टिव्हलचे अध्यक्ष आहेत. मुंबईतील सर्व क्षेत्रातील लोक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत. स्टार्टअप चॅलेंज आयोजित करण्यात आले होते. पर्यावरणातील बदलांवर परिणाम करणारे दहा शाश्वत असे स्टार्टअप निवडण्यात आले होते. त्यातील तीन स्टार्टअपला पोरितोषिक देण्यात आले. जे स्टार्टअप सामान्य माणासच्या जीवनात बदल करणारे असतील तर त्यांच्याशी राज्य सरकारही समन्वय साधून पुढे जाण्याची भूमिका घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना इंडिया आघाडीतील फुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

प्रादेशिक पक्ष काँग्रेसला वाटा देणार नाहीत, पुढेही इंडिया आघाडी चालणार नाही

इंडिया आघाडी अशी कुठलीच आघाडी नव्हती. या आघाडीतील असून, प्रत्येक जण आपापल्या सुरात आम्ही गाऊ आणि एक समूहगीत तयार होईल, असे म्हणत असेल, तर तसे चालत नाही. समूहगीत हे कोरसमध्ये असते. एका दिशेने गावे लागते. एकच गीत गावे लागते. आम्ही एकत्र आहोत, हे भासवण्याचा जो काही प्रयत्न होता, तो आता उघडा पडला आहे. हे लोक एवढ्याचसाठी एकत्र राहू शकत नाही की, जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत, त्या पक्षांची त्या त्या ठिकाणी काँग्रेसची थेट स्पर्धा आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला आपला वाटा देणार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडी चालेल असे मला कधीही वाटले नाही, पुढेही ही आघाडी चालणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली.

 

Web Title: devendra fadnavis reaction on india alliance clashes on seat allocation in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.